akola buldana news Those who take credit for the development fund feel sorry - Guardian Minister Dr. Rajendra Shingane 
अकोला

विकास निधीचे श्रेय घेणार्‍यांची कीव वाटते -पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

सकाळ वृत्तसेेवा

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा)  ः विकास आराखड्यासंदर्भात आयोजित विशेष बैठकीच्या दिवशी माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देऊन जिजाऊ जन्मभूमि विकास आराखडा सोबतच लोणार व शेगाव विकास आराखड्यासाठी निधी देण्याची विनंती केली. मात्र मला कोरोना संसर्ग झाल्याची संधी काहींनी श्रेय लाटण्यासाठी शोधली असल्याची घाणाघाती टीका पालक मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी एका पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारची आर्थिक स्थिती व्यवस्थित नसताना मतदार संघाच्या विकासासाठी आणलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधी संदर्भात माहिती दिली.


येथील एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, कविष जिंतुरकर, मतदार संघाचे अध्यक्ष गजानन पवार, तालुकाध्यक्ष राजू शिरसाट, ज्येष्ठ नेते गंगाधर जाधव, गणेश सवडे, गणेश बुरकुल, डॉ. अर्पित मिनासे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा विकासासाठी 311 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची घोषणा केली होती.

त्यापैकी 25 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली. सन 2015 पासून जिजाऊ विकास आराखड्यास निधी देण्यात आला नाही. विकास आराखड्याच्या सदर बैठकीत सिंदखेड राजा, लोणार, शेगाव विकास आराखड्यासाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याचा मानस असताना त्याच दिवशी माझी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी बैठकीत उपस्थित राहू शकणार नाही, याची कल्पना देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क करून दिलेल्या लेखी पत्रात नमूद केलेल्या विकास आराखड्याला मंजुरात देण्याची विनंती केली.

उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदर बैठकीत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार संजय रायमुलकर, आकाश फुंडकर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र मी संसर्गित झाल्याची संधी साधून सिंदखेड राजा विकास आराखड्यासाठी 3 कोटी 40 लक्ष रुपयाचा निधी खेचून आणल्या ची भिम गर्जना करण्यात आली. कोणाचेही नाव न घेता अशा गर्जना करून श्रेय लाटणार्‍या यांची मला कीव येत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. पुढे बोलताना ते म्हणाले कोरोना ग्रस्त असतानाही राज्यभर आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यात कमी पडलो नाही. कोरोना संपविण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचे ते यावेळी म्हणाले.

लसीकरण संदर्भात प्रसारमाध्यमांनी ग्रामीण भागात जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यासाठी आमदार निधीतून कार्डियाक एम्बुलेंस खरेदी केल्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली. सिंदखेड राजा येथे उद्योगिक प्रशिक्षण संस्था साठी इमारत मंजुरी साठी सतत पाठपुरावा करून प्रस्ताव कौशल्य विकास मंत्री यांच्याकडे सादर केला. 14 कोटीच्या सदर प्रस्तावास जिल्हा नियोजन समिती च्या माध्यमाने तरतूद केली असून लवकरच इमारतीचे कामास सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदारसंघातील रस्ते व पूल बांधकामासाठी 20 मार्च च्या अंदाजपत्रकात 34 कोटी व 21 मार्च या अंदाजपत्रकात 42 कोटी निधी, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत 13.50 कोटी असे एकूण 89.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली मतदार संघात शेतकरी भवन, क्रीडांगण विकास, जलसंधारणाची कामे,पालकमंत्री पानंद रस्ते विकास कामाच्या कोट्यावधी च्या निधीची मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दुसरबीड येथील जिजामाता साखर कारखाना पंचवीस वर्षाच्या लीजवर देण्याची राज्य शासनाची तयारी आहे व कारखाना सुरू करण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT