akola buldana news While celebrating Ram Mandir, the senior car attendant passed away while accepting the hospitality 
अकोला

अरे बापरे! राम मंदिराचा झाला अत्यानंद अन् कारसेवकाने सोडले प्राण, सत्कार स्वीकारतानाच ह्रदय विकाराचा झटका

विवेक मेतकर

बुलडाणा : राम जन्मभूमी आंदोलनात उत्फूर्तपणे सामील झालेल्या जेष्ठ कारसेवकाचा सत्कार झाला आणि लगेच हृदय विकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मृत्यू झालेल्या या कारसेवकाचं नाव बल्लूजी उर्फ लक्ष्मीकांत मोहरील असून ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या ठिकाणी घडली आहे.

अयोध्या येथे राम मंदिर व्हावे या उद्देशाने तो भारावलेला काळ होता. बल्लूजी मोहरील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक आणि सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांचं वय 77 होते. राम जन्मभूमी आंदोलनात ते 1987 पासून जोडले गेले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राममंदिराचं भूमिपूजन केलं. यानिमित्त मेहकर येथील श्रीराम मंदिरात रामजन्मभूमी आंदोलनात सामील झालेल्या 50 कारसेवकांचा सत्कार स्थानिक समितीने संध्याकाळी 5 वाजता आयोजित केला होता.

त्यावेळी बल्लूजी यांचा सत्कार झाला आणि ते खाली बसले. त्यावेळी अचानक त्यांच्या छातीत कळ आली त्यांना इतर कार्यकर्त्यांनी नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण त्याआधीच त्यांची प्राणज्योत आधीच मावळली होती. बल्लूजी मोहरीला हे पेशाने शिक्षक होते.

स्थानिक मे.ए. सो.हायस्कूलमध्ये त्यांनी नोकरी करून सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये सक्रिय होऊन स्थानिक पातळी पासून ते उपजिल्हाध्यक्ष दी विराजमान झाले होते. त्यांच्या आकस्मिक जाण्याने संघपरिवार हळहळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली आणि आप्त परिवार आहे.

राम मंदिर आंदोलनात तरुंगवासही भोगला....

कट्टर रामभक्त, 3 वेळा कारसेवा दिलेले आणि 1992 मध्ये अयोध्येवरून परत येत असताना उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे 8 दिवस तुरुंगवास भोगलेल्या लक्ष्मीकांत उर्फ बल्लूजी मोहरील यांनी आपला प्राण मेहकरातील बडा राम मंदिरातच सोडल्याची दुःखद घटना घडली. याशिवाय मेहकरातील नामांकित असलेल्या महेश अर्बन क्रेडीट सोसायटीचे ते संस्थापक सदस्य होते. आज राममंदिराचा भूमिपूजन सोहळा असल्याने ते आनंदातच होते. मात्र सत्कार सोहळ्यादरम्यानच त्यांचं निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

Latest Marathi News Updates : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

SCROLL FOR NEXT