Soyabean breaks down in Talegaon sakal
अकोला

अकोला :...अन् पावसाने फुटले सोयाबीनला कोंब

सप्टेंबर महिन्याच्या अंतिम सप्ताहात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस या सर्वच पिकांना बसला आहे.

सकाळ वृत्तसेवा

साखरखेर्डा (जि. अकोला) : सप्टेंबर महिन्याच्या अंतिम सप्ताहात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस या सर्वच पिकांना बसला आहे. या बाधित पिकांच्या नुकसानीचा विमा काढलेले व विमा न काढलेले असा भेदभाव न करता सरसकट सर्व्हे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व सर्वच बाधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी बुलडाणा जि. प. चे माजी कृषी सभापती तथा विद्यमान जि.प.सदस्य दिनकरबापू देशमुख यांनी शासनाकडे केली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात तालुक्यात जवळ जवळ १३२ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे हाताशी आलेल्या मूग, उडीद सोयाबीन आदी पिकांची हानी झाली. या अतिवृष्टीचा मोठा फटका परिपक्व झालेल्या उभ्या सोयाबीन या नगदी पिकाला सर्वांत जास्त बसला आहे. शासनाने या नुकसानीचा आढावा घेत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन पीक विमा भरलेल्या शेतकर्‍यांना नुकसानीबाबतीत विमा कंपनी कडे अर्ज करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत.

शासनाकडून महसूल विभाग व कृषी विभागाकडून प्रत्यक्ष पाहणी करून पिकहानी निश्‍चित केली जाऊन ते शासनाकडे जाते. मात्र, यामध्ये विमा न भरलेल्या शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता असून, अशा शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे. कारण पिकविमा सुरू झाल्यानंतर बहुतांश शेतकर्‍यांनी बाधित पिकांची नुकसानभरपाई मिळेल या आशेने सुरवातीला पिकविमे काढले. अगदी अनेक वेळा वेबसाइटवर गर्दी झाल्याने पिकविमा भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अनेक शेतकर्‍यांचे हप्ते भरणे राहत असे.

तेव्हा कृषी मंत्रालयाकडून पुन्हा पिकविमा भरण्याची तारी वाढविण्यासाठी हालचाल करून तारखा वाढवून बहुतांश शेतकरी पिकविमा संरक्षण घेत असत. पिकविमा काढणे सक्तीचे केल्याने कर्ज काढणार्‍या शेतकर्‍यांच्या पिकांचे पिकविम्यांचे हप्ते कर्जे देणार्‍या बँका त्यांच्या शेती कर्जातूनच कंपनीकडे जमा करीत असत. अशा रीतीनें ९० ते ९५% शेतकरी पिकविम्यांचे संरक्षण घेत असत. परंतु काही अपवाद वगळता बर्‍याच विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांच्या हाती भोपळाच दिल्याचे मागील काही वर्षांत दिसून आले आहे.

त्यामुळेच मागील एक-दोन वर्षापासून बँकांनीही शेतकर्‍यांना पिकविमे भरणे ऐच्छिक केले होते. गेल्या काही वर्षात एखाद दोन अपवाद वगळता पीक विम्याबाबत शेतकर्‍यांपेक्षा विमा कंपन्यांचेच उखळ पांढरे झाले असल्याची चर्चा शेतकरी वर्ग तथा नागरिकांत आहे. परिणामी मागील वर्षी पासून ५०% पेक्षाही कमी शेतकर्‍यांनी पीक विमे काढले आहेत. व ज्यांनी काढले आहेत ते प्रत्यक्ष पेर्‍यापेक्षा कमी क्षेत्राचे म्हणजे १०एकरवर पेरा असेल तर २एकरांचा विमा असे काढले आहेत.

यावर्षी गेल्या दोन तीन दिवसातील धुवाधार व संततधार पावसाने तालुक्यातील सर्वच शेतकर्‍यांच्या परिपक्व झालेल्या उभ्या पिकांची मोठी हानी झाली आहे.त्यात विमाधारक शेतकरी व बिगर विमा धारक शेतकरी असा भेदभाव केलेला नाही. त्यामुळे शासनानेही कोणताही भेदभाव न करता सरसकट लाभ मिळावा या दृष्टिकोनातून ओला दुष्काळ जाहीर करून या अस्मानी संकटात हतबल झालेल्या बळीराजा दिलासा द्यावा,अशी कळकळीची मागणी

खातेदारांनी फिरविली पाठ

सिंदखेडराजा तालुक्यात ४१,४३५ अल्पभूधारक व अत्यल्प भूधारक शेतकरी खातेदार आहे. ८,६७१ शेतकरी मध्यम भूधारक असून, एकूण ५०,०९६ शेतकरी खातेदार आहेत. त्यापैकी केवळ ३९,५३६ खातेदारांनी पीक विमे काढले आहेत. तालुक्यातील एकूण खातेदार शेतकऱ्यांपैकी जवळजवळ १०,५६० खातेदारांनी पिकविमा भरण्याकडे पाठ फिरविली आहे. मागील हंगामात यापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी पिकविमा भरला होता. परंतु, त्यांच्या हातावर अजूनपर्यंत तरी कंपनीने तुरी दिल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी अतिशय अल्प शेतकर्‍यांना पीक विमा मिळाला. कंपनी फक्त भरघोस विमा रक्कम गोळा करून घेते पण नंतर शेतकर्‍यांच्या भल्याबुर्‍याकडे ढुंकूनही पाहत नाही. उलट विमा मिळविण्यासाठी आंदोलने, ओरड, सरकार दरबारी याचना करावी लागते. त्यामुळे दरवर्षी शेतकरी पिकविमा भरण्याबाबत उदासीन दिसत आहेत.

गेल्या वर्षी माझ्या पिकांचा पीक विमा बँकेत भरला होता. मागील हंगामात माझ्या पिकांचे नुकसान झाले. सर्व्हे झाले. अजूनपर्यंत एक रुपयाही मदत मिळाली नाही.

- दशरथ दौलतराव उगले, पांग्री उगले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT