Akola
Akola  esakal
अकोला

Akola : हनुमंतासम हात जोडुनी पूजावा घनश्याम..!

सकाळ डिजिटल टीम

बाळापूर : ‘ओठांवरती रोज प्रभाती, घ्यावे मंगल नाम..

हनुमंतासम हात जोडुनी, पूजावा घनश्याम..!’

श्री रामचन्द्र, लक्ष्मण व सीता यांच्या संगमरवरी मूर्तींच्या वास्तव्याने पावन असलेलं गांव म्हणजे रिधोरा..! या गावात प्रभू श्रीरामांचे सुंदर व प्राचीन मंदिर पाहण्याजोगे आहे. या मंदिराची महती, इतिहास याला एक वेगळीच ओळख आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची पावले आपसूकच या मंदिराकडे वळतात.

बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील श्री रामचंद्र व हनुमान संस्थानच्या मंदिरातील श्रीराम, लक्ष्मण व सीताच्या पुरातन मूर्ती मराठा कालखंडातील आहेत. हे मंदिर नागरीकांचे ग्रामदैवत आहे. मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र आहे. या मंदिराची वास्तुशैली दाक्षिणात्य मंदिराप्रमाणे आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत रिधोरा येथील मंदिरातील शिल्परचना उच्च प्रतीची आहे.

पश्चिमामुख असलेल्या या मंदिराच्या बाहेरील प्राकाराची रचना जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. अर्धखुला मंडप, आणि हनुमान व रामसिता, लक्ष्मणाचे समोरा- समोर असलेले मुख असा त्या मंदिराचा परिसर आहे. मंदिरात प्रवेश करताना डाव्या बाजूला शिवलिंग आहे. मंदिराच्या आतील मूर्ती सोळाव्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी, मूळ मंदिर आयाताकृतीत होते. व नंदीचा मंडप एकाच छताखाली होता. १६६१ मध्ये मंदिराची पुनर्निर्मिती झाली. त्यानंतर १९०० मध्ये गंगाबाई भिवसन मराठे (देशमुख) यांनी २५ एकर शेतजमीन मंदिराला दान देत मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला.

त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराच्या भिंतींवर कोरीवकाम, मूर्तीकाम करण्यात आले. मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतींवर सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व भगवान श्रिकृष्णाचे प्रसंग कोरलेले आहेत. गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी, इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन त्‍या मंदिरावर कोरलेले आढळतात. नंदीच्या मंदिरावर बांधलेली घंटा ही मंदिराच्या सुशोभनात वापरली आहे. मंदीराच्या पाऊलखुणा दुरवर विखुरलेल्या असल्याने गावाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. श्री रामचंद्र व मारोती संस्थान मंदीराचा कारभार अविरतपणे सांभाळत आहे. दरवर्षी श्री राम नवमी व हनुमान जयंतीचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो.

रामसीता, लक्ष्मणाची मूर्ती प्रमुख आकर्षण

संपूर्ण मंदिराची वास्तू ही अत्यंत देखणी असून, प्रामुख्याने मंदिराला २० फुट उंचीवर तीन कळस आहेत. मंदिरात असलेल्या रामसीता व लक्ष्मणाच्या अत्यंत सर्वांगसुंदर प्रसन्न मूर्ती हेच येथील प्रमुख आकर्षण आहे. ह्या अत्यंत जिवंत आणि जागृत मूर्ती आहेत. संपूर्ण मंदिर परिसरच अत्यंत मंगल व पवित्र स्पंदनाने भारावलेला आहे. येथील महाद्वारच मंदिराचे भव्य दिव्य स्वरूपाची कल्पना देते.

मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

गुरुवारी सकाळी पावणे अकरा वाजता पासून मंदिरामध्ये ‘श्रीराम जय राम जय जय राम’ विजय महामंत्र अखंड जप सतत पाच दिवस होणार आहे. त्यानंतर सोमवारी ता. (२२ रोजी) सकाळी ७ वाजता अभिषेक व गावातून कलश यात्रा काढण्यात येईल. संध्याकाळी ७ वाजता महाआरती होणार असून यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मंदीराचे पुजारी बद्रिनाथ महाराज यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT