soyabean damage news esakal
अकोला

Akola : स्वप्नांचा झाला चिखल; अपेक्षांची वाताहत

जिल्ह्यात मुसळधार: कापलेल्या सोयाबीनची प्रचंड नासाडी; शेतकरी विवंचनेत

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : अतिवृष्टीत आधीच तोळामासा उरलेले पीक दिवाळी गोड करेल अशी अपेक्षा असताना जिल्ह्यात पुन्हा परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी कोसळलेल्या मुसळधार पावसाने शेतात कापलेल्या सोयाबीनचा चिखल केला आहे. या अस्मानी संकटाने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून त्याला आता मदतीची नितांत गरज निर्माण झाली आहे.

पावसाळ्याच्या तीन महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टीत पिकांचे केवळ अवशेष उरले होते. सखल भागातील पीक तर पुर्णपणे नष्ट झाले मात्र उंचावर उतारावर असलेल्या शेतातील पीक काही प्रमाणात वाचले होते. मात्र आता ते उरलेले पिकही शेतकर्यांच्या नशीबात नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चार दिवसांपासून पावसाने थोडी उघडीप दिल्याने शेतकर्यांनी सोयाबीन कापणीला सुरूवात केली होती. मात्र सोमवारी रात्री वाशिम जिल्ह्यात सर्वत्र सतधार मुसळधार पाऊस चालू असून शेतकऱ्यांची काढणीस आलेले सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिकाच्या वर पाणी गेल्याने पिके पाण्यात सडल्यामुळे नुकसान झाले आहे.

गेल्या दोन दिवसापासून मालेगाव तालुक्यातील मसला खुर्द, खडकी, इजारा, पांगरी नवघरे, मालेगाव, मुसळवाडी, अमानवाडी, धम्धमी, माळेगाव, कुतरडोह, धरमवाडी, पिंपळसेंडा, रामराव वाडी परिसरात सतत मुसळधार पाऊस चालू असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोंगून ठेवलेले सोयाबीन व सोंगून ठेवलेली सोयाबीनची गंजी यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आहे. तसेच मंगळवारी सकाळी मालेगाव मानोरा वाशीम व मंगरुळपीर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने पिकाचा चिखल झाला आहे. अतिवृष्टी मध्ये बळीराजा अडचणीत आला असून हाता तोंडाशी आलेला घास ऐन दिवाळीच्या सणासुदीत निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी राजा मोठ्या चिंतेत पडला आहे. त्यातच विमा कंपन्याने शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत कोणत्याच प्रकारची नुकसान भरपाई न दिल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड रोष निर्माण झला आहे.

मदत सरणावर मिळणार काय?

सतत तीन महिने अतिवृष्टीत शेतकरी पुरता रसातळाला गेला. शासनाने अतिवृष्टीची मदतही जाहीर केली. दोन कोटी रुपये जिल्ह्याच्या तिजोरीत जमाही झाले. मात्र प्रशासकीय टोलवाटोलवीत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत अजूनही पोचली नाही. महसूल, कृषी विभाग तसेच ग्रामसेवकांकडे खाती अपडेट करण्याचे काम अजून पुर्ण का झाले नाही. याचा जवाब जिल्हाधिकार्यांनाच द्यावा लागणार आहे. अन्नदात्याची दिवाळी थोडी गोड करण्यासाठी या यंत्रणा आढेवेढे घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. इकडे अन्नदाता टाचा घासून मृत्यूपंथाला लागला असताना ही मदत काय त्याच्या सरणावर ठेवणार काय, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.

दिनांक १७ सप्टेंबर व १८ सप्टेंबर पासून आमच्या भागात मुसळधार पाऊस चालू असून माझ्या शेतातील ३४ एकर मधील सोयाबीनच्या गंजा तीन फूट पाण्याखाली गेल्याने माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे

- प्रकाश आंधळे, शेतकरी, मुसळवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagaradhyaksha Results 2025 : राज्यात भाजपा १ नंबरचा पक्ष, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार विजयी? वाचा विभागनिहाय यादी...

IND vs PAK U19, Final: वैभव सूर्यवंशी - आयुष म्हात्रे पाकिस्तानी खेळाडूंना भिडले; विकेट्सनंतर घडली चकमक; Video Viral

Latur to Badlapur: लातूर ते मुंबई प्रवास फक्त ५.५ तासांत होणार! कोकण–मराठवाड्याला थेट जोडणारा हाय-स्पीड हायवे मंजूर, पाहा मार्ग

Devendra Fadnavis: नगरपरिषद निवडणुकांत भाजप नंबर वन! देवेंद्र फडणवीसांनी विजयाचं श्रेय कुणाला दिलं? म्हणाले...

हृदयद्रावक घटना! 'टिप्परच्या धडकेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू'; आजारी मुलाला शाळेतून आणताना गुरसाळेत काळाचा घाला..

SCROLL FOR NEXT