Akola: It will rain from Sunday, do crop planning to avoid damage 
अकोला

उद्यापासासून पावसाची दमदार बॅटींग, नुकसान टाळण्यासाठी करा पिकांचे नियोजन

विवेक मेतकर

अकोला ः हवामान खात्याच्या पूर्वानुमानानुसार विदर्भात ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेले सोयाबीन, खरीप ज्वारी व कापसाचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

सध्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन पीक कापणी सुरू आहे. बऱ्याच शेतावर कापणी करून सुखवणी करिता छोटे ढीग केलेले आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेले पीक योग्य ठिकाणी जमा करून मळणी करून घ्यावी, पिकाचे पावसापासून होणारे नुकसान टाळावे.

ज्या शेतकऱ्यांना मळणी करणे शक्य नाही, अशा शेतकऱ्यांनी जमा केलेल्या सोयाबीनची सुडी उंचवट्याच्या ठिकाणी लावून व्यवस्थित ताडपत्रीने झाकून घ्यावी, जेणेकरून सुडीमध्ये पावसाचे पाणी जावून नुकसान होणार नाहीत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आखाती देशांतून भारतासाठी गुड न्यूज! कच्च्या तेलाचे दर २७ टक्क्यांनी घसरले, भारताला कसा होणार फायदा? वाचा...

Jensen Huang: एक दोन तीन नव्हे... जेन्सेन हुआंग यांच्या अफेअर्सची यादी संपेना! नव्या खुलाशाने उडाली खळबळ

Punjab Election 2027: पंजाबच्या राजकारणात मोठी घडामोड! सहा वर्षांनंतर भाजपचा जुना मित्र पुन्हा सोबतीला; शाहांनी सांगितला मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला

कार्तिक पौर्णिमेलाच का घेतात कार्तिकस्वामींचे दर्शन? जाणून घ्या पुण्याच्या पर्वतीपासून गुजरातच्या पाटणपर्यंतची अनोखी परंपरा...

Latest Marathi News Update: 'अदानी ग्रीन एनर्जी'ला काळ्या यादीत टाकण्याची सयाजी शिंदेंची मागणी

SCROLL FOR NEXT