Akola Marathi News Akola Zilla Parishad News Teachers will be contracted 
अकोला

झेडपीचे शिक्षक कंत्राटी होणार, १५२ शिक्षकांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

अकोला :  अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेले, अनुसूचित जामातीचा दावा साेडलेले नियमित शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने अर्थात ११ महिन्यांच्या कालावधीसाठी कार्यरत करण्यासाठीची (अधिसंख्य पदावर वर्ग करणे) प्रक्रिया साेमवारी (ता. २८) जवळपास पूर्ण झाली.

त्यामुळे कारवाई झालेल्या १५२ शिक्षकांना लवकरच आदेश जारी करण्यात येतील. कारवाईतून जवळपास १९ प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा - हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी


सर्वाेच्च न्यायालयाने एका याचिकेवर ६ जुलै २०१७ राेजी निर्णय दिला हाेता. त्यानुसार मागास जातींना असलेल्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत रूजू झालेल्या आणि त्यानंतर जातीचे दावे अवैध ठरलेल्या व्यक्तींना शासकीय सेवेत संरक्षण देय ठरत नाही.

हेही वाचा - नव्या स्ट्रेंथचे रहस्य कायम; इंग्लंड रिटर्नच्या संपर्कातील पाच जण पॉझिटिव्ह

त्यामुळे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २१ डिसेंबर २०१९ राेजी आदेश जारी करून न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली. त्यानुसार जिल्ह्यातील १७० शिक्षक अधिसंख्य होते. संबंधित शिक्षकांपैकी १५२ शिक्षकांवर कारवाई करण्यात आली असून १९ प्रकरणे तूर्तास प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे प्रलंबित ठेवण्यात आलेल्या प्रकरणांवर केव्हा कारवाई करण्यात येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

दोन वर्षातून १ चित्रपट तरीही कोट्यवधींचा मालक आहे सलमान खान; कुठून होते अभिनेत्याची कमाई, वाचा साइड बिझनेसचं गणित

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Latest Marathi News Live Update : मुलांकडून इंटरनेट वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे करावेत: उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT