Akola Marathi News Amravati-Mumbai Ambanagari Express will run again from Monday
Akola Marathi News Amravati-Mumbai Ambanagari Express will run again from Monday 
अकोला

अमरावती-मुंबई अंबानगरी एक्स्प्रेस सोमवारपासून पुन्हा धावणार

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः पश्चिम विदर्भातून मुंबईकरीत धावणारी एकमेव रेल्वे गाडी अमरावती-मुंबई अंबानगरी एक्स्प्रेस कोरोना संकट काळात बंद करण्यात आली होती. व्यापारी व प्रवाशांच्या मागणीवरून ही गाडी २५ आणि २६ जानेवारीपासून दोन्हीकडून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तुर्तास आरक्षण असणाऱ्या प्रवशांनाच या गाडीने प्रवास करता येणार आहे.

पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, अमरावती, वाशीम, हिंगोली, जळगाव या जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी सर्वात सोयीची गाडी म्हणून अंबानगरी एक्स्प्रेसला पसंती मिळत होती.

ही गाडी सुरू झाल्यापासूनच प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद या गाडीला मिळाला आहे. कोरोना संकट काळात ही गाडी इतर गाड्यांप्रमाणेच बंद करण्यात आली होती. आता शासनाने ही गाडी सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.

त्यानुसार मुंबई येथून ता. २५ जानेवारीला आणि अमरावती येथून ता. २६ जानेवारीला ही गाडी तिच्या निर्धारित वेळेनुसार सुटणार आहे.

अंबा नगरी एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भात अनेक व्यापारी संघटना व नागरिकांनी मागणी केली होती. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी ही गाडी सुरू करण्यासंदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे आग्रह धरला होता.

त्यानुसार अंबानगरी एक्स्‍प्रेस सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवार, ता. २२ जानेवारीपासून या गाडीचे दोन्ही कडील आरक्षण सुरू होत आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी ही गाडी सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच प्रवासी संघटनांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

SCROLL FOR NEXT