Akola Marathi News became an educational qualification for the Gram Panchayat elections 
अकोला

ग्रामपंचायत सदस्याची इयत्ता कंची? वाचा भावी सरपंच किती असेल शिकलेला

सकाळ वृत्तसेवा

डोणगाव (जि.बुलडाणा) : राज्यात ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून शासनाने सरपंच पदाचे आरक्षणाला स्थगिती दिली आहे. सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीत निवडणूक लढवायची असेल तर नवीन नियमानुसार जो उमेदवार 1 जानेवारी 1995 किंवा त्यानंतर जन्मला असेल त्या उमेदवाराला  7 वी पास असणे आवश्यक राहणार आहे.


राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली आहे. तत्पूर्वी निवडणूक विभागाने सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले होते. परंतु निवडणूक जाहीर झाल्या नंतर आरक्षणाला स्थगिती दिली आहे.

त्यामुळे प्रमुखाचा हिरमोड झाला आहे.सध्या तालुक्यात 64 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून सध्या इच्छुकांची कागदपत्र जुळवा जुळव चालू आहे.निवडणूक आयोगाच्या नियमतानुसार 21 वर्षा वरील व्यक्तीस निवडणूक लढविता येणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकी नंतर सदस्यांमधूनच सरपंच निवडला जाईल असा निर्णय शासनाने घेतला आहे. आत्ता नवीन नियमानुसार ग्रामपंचायत निवडणूक लढवायची असेल तर ज्या व्यक्तीचा जन्म 1 जानेवारी 1995 अथवा त्या नंतर झाला असेल आणि जिला या कलम 3 च्या 13 च्या सुधारणे नुसार या अधिनियमाखाली आत्ता किमान 7 वr पासचे अथवा समतुल्य शैक्षणिक अर्हता असल्या खेरीज सरपंच म्हणून निवडणूक लढविता येणार नाही, अशी माहिती मेहकर निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार डॉ. संतोष मुंडे यांनी दिली आहे.

त्यामुळे भविष्यात अशिक्षित उमेदवाराचे सदस्य होण्याचे अथवा ग्रामीण भागातील राजकारण्यांचे सर्व अधिकार आपल्या हातात ठेवण्याचे स्वप्न भंगणार आहे. या निर्णयाने भविष्यात येणारे उमेदवार हे शिक्षित असणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

CSK पाठोपाठ मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने केली नव्या प्रशिक्षकाची घोषणा! RCB चा कोच फोडला, कोण आहे तो?

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगातील वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचं महत्वाचं भाष्य

प्रमोशनला आला नाही म्हणून वाद, १ कोटींचा दंड; अंकित मोहनने मांडली त्याची बाजू, म्हणाला...

SCROLL FOR NEXT