Akola Marathi News Corona blast Three deaths in one day, 771 active patients 
अकोला

कोरोनाचा स्फोट; एकाच दिवसात तिघांचा मृत्यू, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७७१

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  कोरोनामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त ३ रुग्णांचा मंगळवारी (ता. ९) मृत्यू झाला. याव्यतिरीक्त ५९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील मृतकांची संख्या ३४१ झाली आहे. याव्यतिरीक्त ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा ७७१ वर पोहचली आहे.


कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. ९) ३१७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २५८ अहवाल निगेटिव्ह तर ५९ अहवाल पॉझिटिव्ह आले.

याव्यतिरीक्त तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात कापशी येथील एका ६७ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. सदर महिलेला १ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू सुकळी ता. बार्शीटाकळी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा झाला. त्यांना ६ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. तिसरा मृत्यू खासगी रुग्णालयाती रुग्णाचा झाला. सदर रुग्ण केशव नगर, अकोला येथील ६० वर्षीय पुरूष होते. त्यांना १ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. या तीन मृत्यूमुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बळींची संख्या ३४१ झाली आहे.

हेही वाचा - आरक्षण निघाले; उमेदवारच नाही! आता काय करणार?

या भागात आढळले नवे रुग्ण
मंगळवारी (ता. ९) ५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात २३ महिला व ३६ पुरुष रुग्ण आहेत. त्यात मूर्तिजापूर आणि अकोट येथील प्रत्येकी आठ, डाबकी रोड, मोठी उमरी, तोष्णीवाल ले-आऊट येथील प्रत्येकी चार, बाभुळगाव, रतनलाल प्लॉट येथील प्रत्येकी तीन, सहकार नगर, केडीया प्लॉट, हिवरखेड येथील प्रत्येकी दोन तर उर्वरीत राऊतवाडी, बार्शीटाकळी, कलालची चाळ, गुडधी, तापडीयानगर, गोडबोले प्लॉट, न्यू तापडीयानगर, पातूर, जुने शहर, कैलास टेकडी, न्यु भागवत प्लॉट, जवाहर नगर, गंगानगर, सिव्हील लाईन, गीता नगर, बोरगाव मंजू, जीएमसी, निंबोरा, ओम सोसायटी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवाशी आहेत.

हेही वाचा - गुपचूप हलवले जात होते शासकीय कार्यालय, भाजप, प्रहारचे कार्यकर्त्यांनी वाचा काय केले

९५ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून दोन, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून तीन, सुर्याचंद्र हॉस्पिटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ८७ अशा एकूण ९५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

हेही वाचा - महिलेनेच केले लैगिक शोषण, बलात्काराचा गुन्हा दाखल होताच युवकाने उचलले टोकाचे पाऊल

कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ११९२१
- मयत - ३४१
- डिस्चार्ज - १०८०९
- ॲक्टिव्ह रुग्ण - ७७१

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT