Akola Marathi News Eight corona positive patients arrived in Akola from England 
अकोला

कोरोनाची धास्ती, उडाली झोप; इंग्लंडवरून पोहोचलेल्या आठ प्रवाशांमुळे वाढली डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : इंग्लंडमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील ८ जण इंग्लंडहून भारतात परत आल्याची माहिती आहे. संबंधित प्रवाशी विमानाने मुंबई येथे उतरल्यानंतर त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पुढील प्रवासासाठी सोडण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, संबंधित सर्व प्रवाशी अकोला जिल्ह्यात पोहचले असून, त्यांच्यावर आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.


कोरोनाची साथ आटोक्यात येत असतानाच आता या इंग्लंडमध्ये नवीन प्रजातीचा कोरोना निर्माण झाल्याच्या घटनेने आरोग्य विभागाची चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. सध्याच्या या परिस्थितीत जो जुना कोरोना अस्तित्वात होता त्याच्यामुळे लाखो नागरिक या संसर्गजन्य आजाराने बाधित झाले तर हजारोच्या संख्येने नागरिकांचा मृत्यू झाला. परंतु आता कोरोना नवा अवतार समोर आला असून तो जुन्या पेक्षा अधिक घातक व वेगाने प्रसारित होत असल्याची माहिती समोर आली आहे.

नव्या कोरोनाचे रुग्ण सध्या इंग्लंडमध्येच आढळत आहेत. त्यामुळे इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय नागरिक परत मायदेशी येत आहेत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील ८ नागरिकांचा समावेश आहे. संबंधित नागरिक मुंबई येथून अकोल्यात दाखल झाले आहेत. परंतु त्यांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याने तूर्तास आरोग्य विभागाने सुटकेचा निश्वास घेतला आहे.

हेही वाचा - पाचशे रुपये द्या अन्यथा बाळ देणार नाही, प्रसुती झालेल्या महिलेची रुग्णालयाकडूनच अडवणूक

सर्व प्रवाशी होम क्वारंटाईन
इंग्लंड येथून मुंबई मार्गे अकोल्यात पोहचणाऱ्या प्रवाशांना सध्या आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे. संबंधित प्रवाशांना इतर ठिकाणी फिरण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. असे असले तरी संबंधितांवर आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT