Akola Marathi News Farmers deprived of subsidy, case filed against agricultural assistant
Akola Marathi News Farmers deprived of subsidy, case filed against agricultural assistant 
अकोला

शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणे भोवले, कृषी सहायकाविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेेवा

अकोट (जि.अकोला) :  गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे मूग व उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले होते. या सर्वेक्षणात कोणतीही तक्रार होणार नाही आणि कुणीही बाधित राहणार नाही याबाबतचे दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी संबंधितांना देण्यात आल्या होत्या.

परंतु तालुक्यातील मुंडगाव येथील तलाठी, ग्रामसेवकासह कृषी सहायकाने निष्काळजी केल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहले. या प्रकरणी मुंडगाव येथील शेतकरी सेवकराम खंडूजी नागोलकर यांनी ता.१५ नोव्हेंबर २०२० रोजी तर सुनील श्रीराम सदार व इतर शेतकरी यांनी ता. २८ डिसेंबर २०२० रोजी मूग, उडीद पिकांची नोंद केली असतानाही नुकसानभरपाईची रक्कम खात्यात जमा न झाल्याची तक्रार वरिष्ठांकडे केली होती.

या तक्रारीची दखल घेत तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला होता. संबंधितांनी अद्यापपर्यंत कुठलाही खुलासा सादर केला नाही. यानंतर मंडळ अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी यांना प्राप्त तक्रारीची घटनास्थळी जाऊन चौकशी करणे व अहवाल सादर करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते.

मंडळ व कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करून आपला अहवाल सादर केला. त्यावेळी अहवालात संबंधित शेतकऱ्यांची पिकांची नोंद असूनही अनुदान यादीत नाव नसल्याचे दिसून आले.

अनुदानापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांनाची संख्या यापेक्षाही जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सर्व प्रकाराची चौकशी केल्यानंतर सप्टेंबरच्या सर्वेक्षणाच्या कामांमध्ये हलगर्जी झाल्याचे व शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्याचे लक्षात आल्यानंतर रवींद्र चंद्रकांत यन्नावार यांच्या लेखी तक्रारीवरून अखेर अकोट ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस चे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी म्हणून मनोज पांडुरंग कोल्हटकर अधिक तपास करीत आहे.

हेही वाचा - अकोल्यात प्रथमच शॉर्ट फिल्म फेस्टिवल स्पर्धा

काय म्हणतो आपत्ती व्यवस्थापन अधिनियम
- आपत्ती व्यवस्थापन अधिनियम- २००५-कलम ५६ अंतर्गत कर्तव्य बाजावण्याचे निर्देश दिले असतील आणि अधिकाऱ्याने कर्तव्याचे पालन न केल्यास किंवा परवानगीशिवाय आपली कर्तव्ये मागे घेतल्यास, या कलमांतर्गत तो दोषी असल्याचे ठरवले जाऊ शकते. या कलमांतर्गत १ वर्षाचं तुरुंगवास किंवा दंड भरावा लागू शकतो.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

हेही वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT