Akola Marathi News- Four hundred people will get corona vaccine on the first day tomorrow! 
अकोला

उद्या पहिल्याच दिवशी मिळणार चारशे जणांना कोरोनाची लस!

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  कोविड लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. शनिवार, ता.१६ जानेवारी रोजी जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात होईल. जिल्ह्यातील चार केंद्रांवर पहिल्या दिवशी ४०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे.

कोरोना विषाणू कोविड-१९ चे रुग्ण दररोज आढळत आहेत. अशा परिस्थितीत शनिवारपासून सुरू होणारी कोविड लसिकरण मोहीम दिलासा देणारी आहे. जिल्हा व आरोग्य विभागातर्फे ता. ८ जानेवारी रोजी जिल्ह्यात कोविड लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली होती. आता प्रत्यक्ष लसिकरणासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील चार केंद्रावर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. या चारही केंद्रावर प्रत्येकी १०० जणांना असे एकूण पहिल्या दिवशी ४०० जणांना लस दिली जाणार आहे.

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक; आपल्या गावकडे येणार का ही महिला अधिकारी ?, तिच्या सौदर्याची सगळीकडेच चर्चा!

लसिकरणासाठी चारही केंद्र सज्ज
अकोला शहर व जिल्ह्यातील चार केंद्र कोविड लसिकरणासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यात अकोला शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालय, महापालिकेंतर्गत ऑर्बिट हॉस्पिटल. याशिवाय ग्रामीण भागात बार्शीटाकळी येथील ग्रामीण रुग्णालयत लसिकरण केंद्र सज्ज आहे.

हेही वाचा - लसीची तयारी सुरू तरीही कोरोनाची भीती कायमच, नव्याने आढळले 38 पॉझिटिव्ह रुग्ण

आज पाठवणार लाभार्थ्यांना ‘एसएमएस’
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ज्या लाभार्थ्यांची नोंदणी यापूर्वीच करण्यात आली आहे त्यांना शुक्रवार, ता. १४ जानेवारी आरोग्य विभागातर्फे एसएमएस पाठविले जाणार आहेत. याशिवाय फोन करूनही माहिती दिली जाणार आहे. ‘कोविन’ॲपद्वारे एसएमएसच्या माध्यमातून लसीकरणासंदर्भात माहिती लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. लसीकरणानंतर लाभार्थी घरी गेल्यावर त्याला कुठलाही त्रास झाल्यास त्यांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक केंद्रावर लसीकरणानंतर लाभार्थ्यांना आपत्कालीन संपर्क क्रमांक दिले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : हातात पिस्तूल घेऊन ‘किंग ऑफ शिरूर’ची रील व्हायरल; दहशत निर्माण करणाऱ्या प्रकारावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई कधी?

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT