Akola Marathi News January 26 Paper, plastic national flag Nakoch, action given to Isha 
अकोला

26 जानेवारील कागदी, प्लास्टिकचा राष्ट्रध्वज नकोच, कारवाईचा दिला इशाला

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार कागदी वा प्लास्टिकच्या राष्ट्र्ध्वजांच्या वापरावर बंदीअसून असे ध्वज उत्पादन करणारे उत्पाद, विक्री करणारे विक्रेते, वितरक, मुद्रक यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

कागदी, प्लास्टिकच्या ध्वजांचा वापर थांबविण्यासाठी, नियंत्रण व जनजागृतीसाठी जिल्हा व तालुका पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. कार्यालये, प्रतिष्ठाने इ. ठिकाणी ध्वजारोहण करताना भारतीय ध्वजसंहितेत दिलेल्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे.

वापरण्यास उपयुक्त नसलेले. फाटके, जीर्ण, माती लागलेले रस्त्यावर पडलेले ध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करावे,असे आवाहनही करण्यात आले आहे.

दरम्यान, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय समारंभ मंगळवार, ता.२६ रोजी सकाळी सव्वा ९ वाजता लालबहादूर शास्त्री स्टेडीयम अकोला येथे होणार आहे.

या समारंभात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT