Akola Marathi News Murtijapur MLA Harish Pimple Corona Positive 
अकोला

भाजपच्या आमदारांना कोरोनाची लागण, नातेवाईक कर्मचाऱ्यांची होणार चाचणी

सकाळ वृत्तसेेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला) : येथील आमदार हरीश पिंपळे यांना दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी बुधवारी येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.


तीन दिवसांपासून आपल्या घरातच असलेले आमदार हरीश पिंपळे यांना कोरोना झाल्याची लक्षणे वाटत असल्याने त्यांनी आपली येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात तातडीने रॅपिड अ‍ॅन्टीजन चाचणी करून घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

पुढील उपचारासाठी त्यांनी अकोला सर्वोपचार रुग्णालय गाठले असून, डॉक्टरांच्या सल्ल्याने विविध चाचण्या करून त्यांनी दिलेल्या सल्ल्याने प्रमाणे आपण पुढील उपाय करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर गत ५-६ दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेऊन आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा - औरंगाबादचं नामांतर: ठाकरे यांचा शिवसेनेसह मित्रपक्षांना टोला

जवळच्या नातेवाईक, कर्मचाऱ्यांची चाचणी
आमदार पिंपळे यांच्या नित्याने संपर्कात येणारे त्यांचे स्वीय सहायक, कार्यालयीन कर्मचारी, कार्यकर्ते व परिवारातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता बळावली आहे. याची काळजी घेत सर्वच जवळच्या संपर्कातील व्यक्तींनी आपली कोरोना चाचणी करून घेतली असून, त्याचे अहवाल दोन दिवसात प्राप्त होण्याची शक्यता आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

Prataprao Pawar : कृषी, शिक्षणातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

Harry Brook Record: इंग्लंडच्या कर्णधार हॅरी ब्रूकने रचला इतिहास, T20 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधार रोहित शर्मालाही हे जमलं नाही

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT