Akola Marathi News Oxygen Plant Akola Government Medical College General Hospital 
अकोला

कृत्रिम ऑक्सीजन प्लांट ऑक्सीजनवर

सुगत खाडे

अकोला  :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे संचालित सर्वोपचार रुग्णालय व जिल्हा स्त्री रूग्णालयात उभारण्यात आलेले कृत्रिम ऑक्सीजन प्लांट पांढरे हत्ती ठरत आहेत. ४८ लाख रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा अद्याप सदर दोन्ही प्लांट सुरूच न झाल्याने त्यांची उपयोगिता कोरोना विरुद्धच्या लढाईत शून्य सिद्ध होत आहे.

सर्वोपचारमधील प्लांट परवानगीच्या चक्रात अडकले असून जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्लांटची स्थळ तपासणीच बाकी असल्याने सदर दोन्ही प्लांट शोभेची वस्तु ठरत आहेत.

ऑक्सीजनची कमतरता हे कोरोना रुग्णांमधील एक प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे अति जोखिमग्रस्त रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना कृत्रिम ऑक्सीजन द्यावे लागते. जिल्ह्यात कोरोनाचा वेग अधिक असताना ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात बहुतांश रुग्णांना कृत्रिम ऑक्सीजन द्यावे लागले. परिणामी जिल्ह्यात ऑक्सीजन कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे बहुतांश ऑक्सीजनचे सिलिंडर कोरोनाग्रस्तांसाठीच आरक्षित ठेवावेल लागत होते.

या स्थितीतून जिल्ह्याची सुटका व्हावी व रुग्णांना वेळेवर ऑक्सीजन मिळावे यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वोपचार रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी दोन ऑक्सीजन प्लांट मंजूर केले होते. त्यासाठी ४७ लक्ष ९९ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. सदर दोन्ही प्लांटची नोव्हेंबर महिन्यात उभारणी करण्यात आली, परंतु त्यापैकी अद्याप एकही लांट सुरू न झाल्याने ऑक्सीजन प्लांटचा उपयोग कोरोना विरुद्धच्या लढाईत शून्य होत आहे.

हेही वाचा - मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड केले अन बॅंक खात्यातून 35 हजार उडाले

११ व १३ केएलची क्षमता
सर्वोपचार रुग्णालयातील कोविड आयसीयूजवळ कृत्रिम ऑक्सीजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. प्लांटच्या बंबामध्ये एकदा १० ते ११ केएल (किलो लिटर) कृत्रिम ऑक्सिजन साठवता येते. किमान दीड ते दोन दिवस साठवलेल्या ऑक्सीजनचा उपयोग करता येऊ शकतो. जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्लांटची क्षमता १३ केएल आहे. सदर प्लांटची उभारणी सुद्धा पूर्ण झाली आहे. या प्लांटची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्थळ तपासणीच बाकी आहे, तर सर्वोपचारमधील प्लांटला ज्वलनशील पदार्थ ठेवण्यासाठी आवश्यक असलेली परवानगीच मिळाली नाही.

(संपादन - विवेक मेतकर)

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Money Lending Law: महाराष्ट्रातील सावकार अडचणीत येणार! कायद्यात मोठा बदल होणार; महाराष्ट्र सरकार महत्त्वाचं पाऊल उचलणार

T20 World Cup 2026: पाकिस्तानी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये अव्वल अन् विकेट्स घेणाऱ्यांमध्ये अमेरिकन टॉपर! भारतीय कुठेत?

EKA Mobility : इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, स्त्रीसन्मान अन् तरुणांना रोजगार; EKA Mobility चा तिहेरी विजय! वाचा सविस्तर यशोगाथा

Virar News : भाजपला धक्का! भाजप महिला मोर्चा प्रमुख ॲड. साधना धुरी यांचा बविआत प्रवेश

Latest Marathi News Live Update : आहिल्यानगरमध्ये भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

SCROLL FOR NEXT