Akola Marathi News- Progressive farmer Vitthal Thombre from Kanheri earned huge income from agriculture
Akola Marathi News- Progressive farmer Vitthal Thombre from Kanheri earned huge income from agriculture 
अकोला

‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’, कान्हेरीच्या विठ्ठलाने शेतीलाच केले ‘पंढरी’

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः प्रयोगशीलतेचा वारसा जपणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये बार्शीटाकळी तालुक्‍यातील कान्हेरी सरपच्या विठ्ठल श्रीकृष्ण ठोंबरे यांचाही समावेश होतो. विठ्ठल ठोंबरे यांनी आपल्या १७ एकर शिवारालाच प्रयोगशाळा करीत त्यावर बारमाही पिकांचे नियोजन करुन आर्थिक सक्षमतेची वाट प्रशस्त करण्यावर भर दिला आहे.

एवढ्यावरच ना थांबता काळाची पावले ओळखत त्यांनी यांत्रीकीकरणासह आधुनिक पर्यायाच्या वापरावर देखील भर दिला आहे.

या भागात पहिला सौरऊर्जा पंप त्यांनी विहिरीवर बसविला. त्या माध्यमातून तुषार संचाच्या बारा नोझलव्दारे पिकाला पाणी देणे शक्‍य होते. पाच अश्‍वशक्‍तीचा हा पंप आहे. लाभार्थी हिस्सा म्हणून १६ हजार रुपयांचा भरणा त्यांना यासाठी करावा लागला. यामुळे वीजेची मोठी बचत झाली असून दिवसा सिंचन करणे शक्‍य होते, असे विठ्ठल ठोंबरे यांनी सांगीतले.

हरभरा, गहू, तूर या पारंपारीक पिकांसोबतच भाजीपाला पिकातही त्यांची मास्टरकी आहे. मुळा, गाजर, कोबी, मिरची, कांदा, हळद, अद्रक, यासारखी पिके ते घेतात. अशाप्रकारचा व्यवसायीक शेतीपध्दतीचा पॅटर्न त्यांनी जपला असून सेंद्रीय व रासायनीक व्यवस्थापनाचा मध्य साधत ते शेती करतात.

कापसाला दिली फारकत
गेल्यावर्षी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने चार एकरात १५ क्‍विंटलच उत्पादन झाले. त्यामुळे यावर्षी कापूस न घेण्याचा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा ठरला. कापसाऐवजी तीन एकरात उडीद लावला. त्या माध्यमातून एकरी सरासरी तीन क्‍विंटलची उत्पादकता झाली. संततधार पावसामुळे उडीदाची उत्पादकता प्रभावीत झाल्याचे त्यांनी सांगीतले. तूरीची एकरी आठ क्‍विंटलची उत्पादकता होण्याची अपेक्षा त्यांना आहे. तूर काढणीनंतर तीळ लागवड ते करणार आहेत.

हेही वाचा - पुन्हा बलात्काराने हादरला महाराष्ट्र, 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्येच केला बलात्कार

तीळ पीकात सातत्य
तीळाचे एकरी उत्पादन तीन क्‍विंटल राहते. निसर्गाची साथ मिळाल्यास उत्पादकता पाच क्‍विंटलपर्यंत जाते. तीळाच्या एकरी व्यवस्थापनावर चार किलो तीळ, पेरणी, निंबोळी पेंड, गांडूळ खत यावर सुमारे 5550 रुपयांचा खर्च होतो. तीळाची विक्री सरासरी ६५०० रुपये क्‍विंटलने होते. संक्रांतीच्या तोंडावर मागणी वाढल्याने सद्या तीळाचे दर आठ हजार रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Political Murder: धाराशिवमध्ये मतदान केंद्राबाहेर राजकीय कार्यकर्त्याची हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापुरात राम सातपुते आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT