Akola Marathi News Wan Dam ShivSena BJP MLA Akola water supply 
अकोला

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  संपूर्ण अकोला जिल्हा खारपाणपट्ट्यात येतो. असे असतानाही भाजपच्या आमदारांना रविवारी (ता.८) जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीपासून दूर ठेवत अकोला शहरासाठी भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी करण्यात आलेल्या पाणी आरक्षणाच्या तरतुदीवरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अमृत योजनेतून दररोज पाणी मिळावे म्हणून वान धरणातून पाणी आरक्षणाचा प्रस्ताव मनपातील सत्ताधारी भाजपच्या वतीने राज्य शासनाला दिला होता. २४.४ दलघमी पाणी आरक्षण ही भविष्यातील तरतूद असल्याने आताच पाणी उचल होणार नसली तरी शहराची पाण्याची गरज भागविण्यासाठी ते आवश्यक आहे.

शिवाय खारपानपट्टा विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या पोक्रांतर्गत संपूर्ण अकोला जिल्ह्याचा समावेश असतानाही जलसंपदा मंत्र्यांपुढे अर्धवट माहिती ठेवून हेतू साध्य करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

विशेष म्हणजे, या बैठकीला भाजपचे आमदार उपस्थित राहू नये म्हणून त्यांना निमंत्रणही देण्यात आले नसल्याचीही माहिती आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षातील आमदारांचा हेतू साध्य करण्यासाठीच अकोला शहरात जलसंपदा मंत्री असताना भाजपच्या आमदारांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत आहे.

हेही वाचा - भाजपचे आमदार अनुपस्थित असल्याने शिवसेनेने केला ‘गेम’

तीन वेळा बदलले बैठकीचे स्थळ
जलसंपदा मंत्र्यांची आढावा बैठक प्रथम शासकीय विश्रामगृहात आयोजित केली जाणार होती. मात्र तेथे गैरसोयीचे होणार अससल्याने ही बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अपुरी जागा व पूर्व सूचना नसल्याने बैठक अखेर नियोजन भवनात घेण्यात आली. त्या बैठकीला जलसंपदाव विभागाच्या मंत्र्यांसोबतच जिल्हाधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले. बैठकीत मंत्र्यांसोबत असलेले आमदार अमोल मिटकरी यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखही पोहोचले. मात्र शहरातील पाण्याचा विषय असतानाही भाजपच्या एकाही आमदाराला बैठकीला बोलाविण्यात आले नसल्याचे नेमका हेतून साध्य करून घेण्यात आमदार व अधिकारी यशस्वी झाल्याची चर्चा आहे.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानपरिषद निकालानंतर भाजपचे आरोप, शिवसेनेनं प्रत्युत्तर देत नागपूरवरून डिवचलं; म्हणाले, आत्मपरीक्षणाची गरज

Gokul Chairman Election Postponed in Kolhapur : गोकुळ अध्यक्ष निवड लांबणीवर, महायुतीचे संचालक गैरहजर; कोरमअभावी सभा तहकूब, सतेज पाटील काय करणार?

MLC Results : उद्धव ठाकरेंनी जी चूक केली तशी पुन्हा होऊ द्यायची नसेल तर... नागपूर, पुण्यात भाजपच्या पराभवानंतर केशव उपाध्ये यांची पोस्ट चर्चेत

Latest Marathi News Update : विधानपरिषदेवरून भाजपचे आरोप, शिवसेनेनं काय दिली प्रतिक्रिया?

IND vs NZ, 4th T20I: ईशान किशन फिट झाला, तर Playing XI मधून बाहेर कोण जाणार? सॅमसन-सूर्यवंशीबाबत काय निर्णय घेतला जाणार?

SCROLL FOR NEXT