Akola Marathi News- While the counting was going on, a number of cousins attacked him with a knife 
अकोला

धक्कादायक! मतमोजणी सुरू असतानाच सख्ख्या चुलत भावाने केला चाकू हल्ला

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : अकोला जिल्ह्यातील 214 ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. त्यानुषंगाने प्रशासनामार्फत अकोला जिल्ह्यातील सातही तालुकास्तरावर मतमोजणीची सुरू करण्यात आली असून, 4 हजार 411 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतमोजणीत होणार आहे.

मात्र अशातच मतमोजणी केंद्राबाहेर एका व्यक्तीवर चाकू हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसंच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर होत असतानाच अचानक हा हल्ला करण्यात आला. सुरेश पांडुरंग गोपणारायन असं आरोपीचं नाव असून दीपक गोपणारायन असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हे दोघेही नात्याने सख्ख्ये चुलत भाऊ असल्याची माहिती आहे.

2010 मध्ये आपल्यावर चाकूहल्ला केल्याचा राग मनात ठेवून आरोपीने हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव यांच्या पथकाने आरोपाल ताब्यात घेतले असून त्याला कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

दरम्यान, अकोला जिल्ह्यातील गावागावांत निवडणुका निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील 224 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यामध्ये 10 ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्याने अकोला जिल्ह्यातील 214 ग्रामपंचायतींच्या 1 हजार 741 जागांसाठी मतदान घेण्यात आले. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जिल्ह्यात सरासरी 74.17 टक्के मतदान झाले.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC च्या गाजावाज्याच्या पलीकडे 'मूक क्रांती'ची जादू! बंगालच्या राजकारणात RSS च्या ‘नि:शब्द रणनीती’ने कसा इतिहास घडवला?

Election Results 2026 : तृणमूलची १५ वर्षांची सत्ता उलथवली, केरलममध्ये डावे सत्ताबाहेर, पाच राज्याच्या निकालानंतर किती राज्यात भाजपाची सत्ता?

Gokul Milk Administrative Committee : आदेश आला! अखेर गोकुळ दूध संघावर प्रशासकीय अधिकारी मंडळाची नियुक्ती, ५ सदस्यीय मंडळाच्या हातात गोकुळचा कारभार

Childhood Diabetes Management: बालमधुमेहावर केंद्राचा मोठा निर्णय; पहिली राष्ट्रीय नियमावली केली जाहीर!

Mumbai News: भविष्याचा विचार करून भरपाई द्या! न्यायालयाचे ‘मॅक्ट’ला आदेश

SCROLL FOR NEXT