Akola News: 1026 posts required for super specialty; Government sanctioned 888 for the state 
अकोला

सुपर स्पेशलिटीसाठी हवे १०२६ पदं; शासनाने राज्यासाठी मंजुर केले ८८८

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :निमवाडी परिसरातील सुपर स्पेशलिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी एक हजार २६ पदांची आवश्यकता आहे. त्यासंबंधिचा प्रस्ताव शासनाला गत अनेक महिन्यांपूर्वीच सादर करण्यात आला.

परंतु त्यानंतर सुद्धा राज्य शासनाने बुधवारी (ता. २) राज्यातील चार सुपर स्पेशलिटी रुग्णालयांमध्ये प्रथम टप्प्यासाठी केवळ ८८८ पदांची निर्मिती करण्यास मंजुरी दिली.

शासनाने मंजुर केलेल्या पदांचे विभाजन राज्यातील चारही रुग्णालयांमध्ये केल्यास अकोल्यातील रुग्णालयास कमी मनुष्यबळ उपलब्ध होईल.

त्यामुळे कमी मनुष्यबळात रुग्णालय सुरू झाल्यास आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताण वाढेल व रुग्णांना सुद्धा योग्य आरोग्य सुविधा मिळेलच यासंबंधी शका व्यक्त करण्यात येत आहे.


रुग्णांना योग्य दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राज्यात चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली होती. त्याअंतर्गत हॉस्पिटलच्या निर्माण कार्यासाठी जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता.

त्यानुसार, अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चारही ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली. सदर चारही इमारतींपैकी अकोल्यातील इमारतीचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे;

परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे सदर इमारत कोरोना महामारीच्या काळात पांढरा हत्ती ठरत असल्याची ओरड होत होती. परंतु आता शासनाने पदनिर्मिता मंजुरी दिल्यामुळे सुपर स्पेशलिटी रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार सुरू होण्याची शक्यता आहे.

शासनाकडे पाठवण्यात आलेला प्रस्ताव
संवर्ग प्रस्तावित पदं
वर्ग-१ ३५
वर्ग-२ १४५
वर्ग-३ २७७
वर्ग-३ (प्रशासकीय) ७७
वर्ग-३ (तांत्रिक) १०९
वर्ग-४ ३८३
एकूण १०२६

राज्यासाठी मंजुर पदनिर्मितीवर दृष्टीक्षेप
राज्य शासनाने राज्यातील चारही सुपर स्पेशलिटी रुग्णालयांसाठी (पहिल्या टप्प्यात) वर्ग-१ चे ३४, वर्ग-२ चे ३८, वर्ग-३ नियमित ३८८ तसेच बाह्यस्त्रोतांने २८, वर्ग-४ कंत्राटी ३४४ आणि विद्यार्थ्यांची निवासी पदे अशी ८८८ पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. सदर पदांचे विभाजन चारही रुग्णांमध्ये करण्यात येईल व त्याठिकाणी पदभरती करण्यात येईल. त्यामुळे अकोला जिल्ह्याच्या वाट्याला कमी मनुष्यबळ लागण्याची शक्यता आहे.


अंतर्गत काम बाकी
निमवाडी परिसरात साकरलेल्या सुपर स्पेशलिटी रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु अद्याप विद्युत कनेक्शनचे काम काही प्रमाणात अपूर्ण आहे. १५० कोटींच्या सदर रुग्णालयामध्ये ७५ कोटी रुपये इमारत बांधकाम व ७५ कोटी रुपये वैद्यकीय उपकरणांवर खर्च करण्यात येतील.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT