Akola News: Another victim; The number of 21 new positive, active patients reached 652
Akola News: Another victim; The number of 21 new positive, active patients reached 652 
अकोला

आणखी एकाचा बळी; २१ नवे पॉझिटिव्ह, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहचली ६५२ वर

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  कोरोना संसर्गामुळे सोमवारी (ता. १४) आणखी एका रुग्णाचा बळी गेला. याव्यतिरीक्त २१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ३०४ झाली असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६५२ झाली आहे.

कोरोना संसर्ग तपासणीचे सोमवारी (ता. १४) जिल्ह्यात ९९ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७८ अहवाल निगेटिव्ह तर २१ अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा बळी सुद्धा गेला.

संबंधित रुग्ण कबीर नगर, अकोला येथील ६२ वर्षीय महिला होती. तिला ९ डिसेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या व्यतिरीक्त पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये नऊ महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे.

संबंधित रुग्ण राधाकिसन प्लॉट, गोरक्षण रोड, लहान उमरी व अकोट येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित व्याळा ता. बाळापूर, राम नगर, मोठी उमरी, कौलखेड, डाबकी रोड, जीएमसी बॉईज हॉस्टेल, जवाहर नगर, गीता नगर, आकाशवाणी नगर, जठारपेठ, खडकी, आंबेडकर चौक व आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

९१ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सोमवारी (ता. १४) एक, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, बिहाडे हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेंसी येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून एक तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले ८२ अशा एकूण ९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ९८८८
- मृत - ३०४
- डिस्चार्ज - ८९३२
- ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह - ६५२

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT