Akola News: Beneficiaries waiting for village grants; Provision of Rs. 20 lakhs 
अकोला

गाेठ्यांच्या अनुदानासाठी लाभार्थी प्रतीक्षेत; २० लाखांची तरतूद

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे गाेठ्यांसाठीचेही अनुदान लाभार्थ्यांना मिळाले नसल्याची माहिती मिळाली आहे. योजनेसाठी ३५ लाभार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी ११ लाभार्थ्यांना अद्याप अनुदानाची प्रतीक्षा आहे.

पशुपालकांना दिलासा मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे गाेठ्यांसाठी अनुदान देण्याची याेजना काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे. अनुदान तत्वावरील ही याेजना आहे.

आर्थिक वर्ष संपण्यासाठी पावणे चार महिन्यांचा कालावधी राहिला असून, निधी खर्चाचे नियाेजन गतीमान करणे आवश्यक आहे.

त्यामुळे गाेठ्यासाठीचे अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात वळते करणे गरजेचे असून, यासाठी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी हाेत आहे.

दरम्यान गाेठ्याच्या अनुदानसाठी २० लाखाची तरतूद जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीने केली हाेती. त्यानुसार ३५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रत्येक लाभार्थ्याला ५६ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.

अद्याप ११ लाभार्थी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. गाेठा पूर्ण झाल्यानंतर माेजमाप पुस्तिका, सीसी सादर करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पंचायत समितीस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. एमबी-सीसी प्राप्त झाल्यानंतर पडताळणीअंती रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा हाेणार आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT