Akola News: Corona Update; Out of 117 reports, 13 were positive and 23 were discharged 
अकोला

कोरोना अपडेट; ११७ अहवालांमधून १३ पॉझिटिव्ह, २३ डिस्चार्ज

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून शुक्रवारी (ता. ६) कोरोना संसर्ग तपासणीचे ११७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०४ अहवाल निगेटिव्ह तर १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आता कोरोनाचे १९४ रुग्ण उपचार घेत आहेत.

गत सात महिन्यांपासून थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या गत काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. ६) १३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले.

त्यात तीन महिला व १० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जठारपेठ व अकोट येथून प्रत्येकी दोन, तर उर्वरित शिवाजी पार्क, आलेगाव ता. पातूर, तापडिया नगर, दीपक चौक, बलोदे लेआऊट, मूर्तिजापूर, गोरक्षण रोड, माधव नगर व राऊतवाडी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत.


२३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शुक्रवारी (ता. ६) तीन, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, हॉटेल स्कायलार्क येथून तीन तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण करणाऱ्या १२ जणांना, अशा एकूण २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.


कोरोनाची सध्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ८५१४
- एकूण मृत - २८२
- डिस्चार्ज - ८०१५
- ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह - १९४

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामती, राहुरीत पोटनिवडणुकीची घोषणा, केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा केल्या जाहीर

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Gas Crisis: इंधन संकटाची शक्यता! गॅस वितरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष नियम जारी; प्राधान्य कुणाला? पाहा यादी...

LPG Cylinder Blast: एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, ७ जण जखमी

Latest Marathi Live Update : Jalna: अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुलासोबत उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली

SCROLL FOR NEXT