Akola News: Corruption inquiry stalled due to Gram Sevaks leave 
अकोला

ग्रामसेवकाच्या सुटीमुळे रखडली भ्रष्टचाराची चौकशी

सकाळ वृत्तसेेवा

चान्नी (जि.अकोला)  ः पातूर तालुक्यातील उत्पन्नात अव्वल असणारी ग्रामपंचायत म्हणून चान्नी ओळखल्या जाते. परंतु चान्नी येथील शेकडो महिलांनी ग्रामपंचायतींत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून एकच काम वेगवेगळ्या फंडातून दाखवून त्याचा निधी लाटल्याचा आरोप पातूरचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केला आहे.

त्यानुसार पातूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गवई, प्रशासक मोकळकर, सचिव आर.के. बोचरे यांनी ९ नोव्हेंबररोजी महिला समक्ष चौकशी करण्याचे पत्र दिले. त्यानुसार तक्रारकर्त्या महिला ९ नोव्हेंबररोजी सकाळी ग्रामसचिवालयात जमा झाल्या.

चौकशी अधिकारी येणार म्हणून सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत ताटकळत महिला बसलेल्या होत्या. चौकशी अधिकारी गवई, मोकडकर आले आणि ग्रामसेवकांनी दोन दिवस सुट्टीचा अर्ज केला म्हणून चौकशी करता येणार नसल्याचे सांगितले.

त्यावरून सदर महिला खवळल्या आणि पातूरला जायचं का म्हणून गवई साहेबांना विचारत होत्या. सदर घटनेची माहिती विस्तार अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून दिली. त्यानुसार १२ नोव्हेंबररोजी चौकशी होणार असल्याचे विस्तार अधिकारी यांनी सांगितले. चौकशी न झाल्यास उपोषणाला बसणार असल्याचे महिला बोलत होत्या.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Protest : कोयना धरणात ८५ टीएमसी पाणी असतानाही कृष्णा नदी कोरडीच; राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन

IND vs NZ 2nd T20I Live: १,४३४ दिवसानंतर विकेट! भुवनेश्वर कुमारची कमाल, पण अर्शदीप सिंगचा मोठा विक्रम! टीम इंडियाचाही पराक्रम

8th Pay Commission: किमान वेतन ७२ हजारांपर्यंत वाढविण्याची वेतन आयोगाच्या मुंबईतील दोन दिवसीय बैठकीत मागणी

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Video: केंब्रिजमधील त्या रेस्टॉरंटमध्ये काय घडलं? सोनिया गांधींनी सांगितली राजीव गांधींसोबतची पहिल्या भेटीची आठवण

SCROLL FOR NEXT