Akola News: Farmers turn their backs on CCIs cotton procurement
Akola News: Farmers turn their backs on CCIs cotton procurement 
अकोला

सीसीआयच्या कापूस खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

आविनाश बेलाडकर

मूर्तिजापूर (जि.अकोला) : भारतीय कापूस महामंडळा (सीसीआय) च्या कापूस खरेदीला सुरूवात झाली असून, शेतकऱ्यांनी मात्र खासगी व्यापाऱ्यांना प्राधान्य देत सीसीआयच्या खरेदीकडे पाठ फिरविली असल्याचे पाहवयास मिळाले आहे.


यंदा बोंडअळीच्या आक्रमणामुळे मुळात कापसाचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाची मागणी मोठी आहे. त्यात गुरुवारी (ता.१९) पासून भटोरी रस्त्यावरील ओम जिनिंग व दर्यापूर रस्त्यावरील व्यंकटेश जिनिंगमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ ज्येष्ठ सहकार नेते ॲड. भैयासाहेब तिडके यांच्या हस्ते झाला आहे. आजवर केवळ २५५३ शेतकऱ्यांनी कापूस खरेदी केंद्रावर नोंद केली आहे व १ हजार ५०५ क्विंटल ३० किलो कापसाची खरेदी झाली आहे.

सीसीआय चा कापसाचा दर प्रतिक्विंटल ५ हजार ७२५ रुपये आहे. खासगी व्यापारी ५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस खरेदी करीत आहेत. रब्बीचा खर्च व अन्य गराजांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांना नगदी व तात्काळ पैसे मिळणे आवश्यक आसते.

सीसीआय महिनाभराने पैसे देते. खासगी व्यापारी लगेच रोख रक्कम देतात किंवा आरटीजीएसने पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करतात. मागणी जास्त असल्यामुळे नजिकच्या काळात भाव वाढतील या अपेक्षेने शेतकरी तग धरून आहेत. या सर्व बाबींचा परीणाम म्हणून शेतकरी बांधवांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकण्यास प्राधान्य देवून सीसीआयच्या खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.



सीसीआयची कापूस खरेदी दोन्ही संकलन केंद्रावर सहजसुलभ पद्धतीने सुरू आहे. सर्व सुविधा मिळत आहेत. कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा.
-ॲड.अविन अग्रवाल. संचालक, ओम जिनिंग, मूर्तिजापूर.



शेतकऱ्यांकडून प्रतिक्षा
गरज हा शेतकऱ्याचा भाव आहे. कुठल्याही कृषी उत्पादनाला वेळेत भाव मिळाला, तरच शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी गरजपूर्तीसाठी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकला आहे. काही भाव वाढण्याची वाट बघत आहेत.


ओम जिनिंग आणि व्यंकटेश जिनिंग मध्ये कापूस खरेदी सीसीआयने सुरू केली असून, हातगाव रस्त्यावरील लक्ष्मी जिनिंग मध्ये दोन दिवसात सुरू होईल. शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
-रितेश मडगे. सचिव, कृउबास, मूर्तिजापूर.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT