Akola News: Hearing on Zilla Parishad political reservation petition on December 2, attention to Supreme Court verdict 
अकोला

जिल्हा परिषदेच्या राजकीय आरक्षण याचिकेवर २ डिसेंबरला सुनावणी, सर्वाेच्च न्यायलयाच्या निकालाकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा

अकोला  ः जिल्हा परिषद-पंचायत समितीमधील राजकीय आरक्षणाच्या याचिकेवरील सुनावणी दिवाळीच्या सुटीनिमित्त १७ नोव्हेंबररोजी होऊ शकली नाही. त्यामुळे आता सदर सुनावणी २ डिसेंबर राेजी सर्वाेच्च न्यायालयासमाेर हाेणार आहे.

यापूर्वी १ सप्टेंबर २०२० राेजी सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी झाली हाेती. मात्र सरकारतर्फे उत्तर सादर करण्यासाठी चार आठवड्याचा वेळ मागण्यात आल्याने सुनावणी ताेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर शासनाकडून पुन्हा वेळ मागण्यात आला आहे.


जिल्हा परिषदेच्या राजकीय आरक्षणाची टक्केवारी ५० पेक्षा जास्त गेल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांकडून सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आला होता. डिसेंबर २०१८ मध्ये जि.प., पं.सं. सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने शासनाने पुढील आदेशापर्यंत मुदत वाढ दिली हाेती.

अशातच सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीनंतर शासनाने जुलै २०१९मध्ये जि.प. व व पं.सं.वर प्रशासक नियुक्तीचा आदेश जारी केला हाेता. न्यायालयात वाशिम जि.प.चे माजी सदस्य विकास गवळी यांच्यासह काहींनी याचिका दाखल केली होती. १ सप्टेंबर २०२० राेजी सुनावणी झाली. मात्र सरकारतर्फे आणखी वेळ मागण्यात आला आहे. दरम्यान पुढील सुनावणीच्यावेळी हे प्रकरण निकाली काढण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याचे याचिकाकर्ते विकास गवळी यांनी सांगितले.


राज्य सरकारने मागितला वेळ
अकाेला, धुळे, नंदूरबार, वाशिम व नागपूर या जि.प.च्या आरक्षणाच्या मुद्दावर प्रथम सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्यानंतर आता भंडारा, व गोंदिया या जिल्हा परिषदेचा कालावधी संपुष्टात आल्याने निवडणूक जाहीर झाली होती. मात्र कोरोनामुळे या दोन्ही जिल्हा परिषदांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमधील आरक्षणही ५० टक्याच्या आत आणावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. याबाबत आपले म्हणणे मांडण्यासाठी राज्य शासनाने वेळ मागितला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Sangli : शक्तिपीठ महामार्गातून सांगलीतील १९ गावे वगळली, नवीन मार्ग जयंत पाटलांची डोकेदुखी वाढवणार

Financial Risk Management : शेअर बाजार कोसळला तरी टेन्शन नाही! जोखीम व्यवस्थापनाचे 'हे' सोपे नियम प्रत्येक गुंतवणूकदाराला माहित हवेत

वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढला हा अभिनेता; पत्नीच्या इच्छेसाठी घातला सगळा घाट; लग्नाचे फोटो व्हायरल

काय? १६७.२ कोटींना विकलं गेलं ‘यशोदा-श्रीकृष्ण’ चित्र, यात नक्की विशेष काय? Viral

Pune Crime : पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पोटच्या मुलीचा गळा दाबून मुलासह आईने विहिरीत मारली उडी, मुलाचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT