Akola News: How to increase the allowanc without the approval of the finance department? Question of Mahabeej employees
Akola News: How to increase the allowanc without the approval of the finance department? Question of Mahabeej employees 
अकोला

वित्त विभागाच्या मान्यतेशिवाय ‘त्यांना’ वाढीव भत्ता कसा? महाबीज कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न

अनुप ताले

अकोला : महाबीज कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यास वित्त विभाग मान्यता देत नसल्याने कर्मचाऱ्यांचे ४८ महिन्याचे घरभाडे भत्त्याचे नुकसान झाले. दुसरीकडे मात्र, वित्त विभागाच्या मान्यतेशिवाय महाबीजच्या अध्यक्षांनी महाव्यवस्थापक व उपव्यवस्थापकांना वाढीव घरभाडे भत्ता मंजूर केला. ही दुहेरी भूमिका का, असा प्रश्‍न महाबीजच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

चवथ्या, पाचव्या व सहाव्या वेतन आयोगापोटी संचालक मंडळाचे मान्यतेने कर्मचाऱ्यांना अग्रीम मंजूर करण्यात आला आहे. त्याच धर्तिवर सातव्या वेतन आयोगापोटी अग्रीम मिळणे कर्मचाऱ्यांना अपेक्षीत होते.

परंतु, सचिवांनी अग्रीम नाकारल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भावना अधिक तिव्र झाल्या व त्यांनी बेमुदत आंदोलन पुकारले. महाबीज कर्मचाऱ्यांना १२ व २४ वर्षानंतर आश्‍वासीत व सुधारित आश्‍वासीत प्रगती योजना संचालक मंडळाने ४ फेब्रुवारी २०११ च्या १६० व्या सभेमध्ये मंजूरात दिलेली असतानाही प्रस्ताव शासनाचे वित्त विभागात प्रलंबित आहे. या प्रकरणी कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी पाठपुरावा करूनही सचिव वित्त विभागाची मान्यता का घेत नाहीत?

दुसरीकडे महाव्यवस्थापक व उपमहाव्यवस्थापकांना वाढीव घरभाडे स्वतः मंजूर करतात, ही विसंगती का? असे प्रश्‍न उपस्थित करत, कर्मचारी ९ डिसेंबर २०२० पासून संपावर गेले आहेत. बिजोत्पादकांचा प्रश्‍न प्रतिमहिना १२ हजार ५०० कोटी रक्कम व्याजाने काढून शासन राज्य कर्मचाऱ्यांना वेतनापोटी खर्ची करत आहे.

दुसरीकडे महाबीज कर्मचारी सातत्यपूर्ण सेवा देत कमावलेल्या पैशातून स्वतःचे वेतन व भत्ते भागवत आहे. शासनास कुठलाही आर्थिक अधिभार नाही, तरी सुद्धा सातवा वेतन व इतर प्रलंबीत मागण्या निकाली का काढल्या जात नाहीत, असा प्रश्‍न बिजोत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT