Akola News: Husband and wife killed in two-wheeler collision 
अकोला

माय-लेकीची भेट ठरली अखेरची, भाऊबीजेच्या पूर्वसंध्येलाच अज्ञात वाहनाने दिली धडक

सकाळ वृत्तसेवा

सुलतानपूर (जि.बुलडाणा)  ः मेहकर ते सुलतानपूर राज्य महामार्गवार गारवा हॉटेल जवळ अज्ञात वाहणाच्या धडकेत दुचाकी स्वार पती- पत्नी जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (ता. १५) दुपारी २ .३० वाजताच्या सुमारास घडली.


मेहकर तालुक्यातील शेदला येथील मुळ रहिवासी व सध्या मेहकर येथे राहत असलेले नालेगावकर दापंत्य हे देऊळगाव मही येथून मुलीच्या घरुन परत जात असताना काळाने घाला घात. भाऊबिजेच्या पूर्वसंध्येलाच माय -लेकींची ती अखेरची भेट ठरली.

रामेश्वर सीताराम नालेगावकर (वय ४९) व त्याची पत्नी भाग्यश्री रामेश्वर नालेगावकर (वय ४३) हे स्कूटी क्रमांक एएल २४३६ ने जात असताना सुसाट वेगातील अज्ञात वाहनाने नालेगावकर यांच्या गाडीला माघून जबर धडक दिली.

त्यात नालेगावकर दांपत्य चिरडल्या गेल्याने जागीच ठार झाले. त्या अज्ञात वाहनाचा शोध मेहकर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनात मेहकर पोलिस घेत आहेत. मृतक दांपत्यास दोन मुली असल्याची माहिती आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol and Diesel Rate: पेट्रोल-डिझेलचे दर आणखी भडकणार? BPCL ने दिले मोठे संकेत; सर्वसामान्यांची चिंता वाढली

Samarth ITI Placements: समर्थ आयटीआयच्या ६ विद्यार्थ्यांची एक्साईड इंडस्ट्रीजमध्ये निवड; फिटर व इलेक्ट्रिशियन विभागाचा यशोगौरव

Jiregaon Painted Storks: जिरेगावच्या तलावात ‘चित्रबलाक’चा सुरक्षित मुक्काम; मातृत्व, प्रजनन आणि निरोगी परिसंस्थेचे जिवंत प्रमाणपत्र

MI vs RR: हार्दिक पांड्याने टॉस जिंकला, पण जसप्रीत बुमराहला Playing XI मधून बाहेर केलं; कारण काय सांगितलं?

Vidarbha Birds News : करणवाडी तलावात दुर्मिळ ‘लाँग-टोएड स्टिंट’चा शोध; पांढरकवडा वनक्षेत्रातील पाणथळ अधिवासांचे वैज्ञानिक दस्तऐवजीकरण तातडीचे

SCROLL FOR NEXT