Akola News: Long queues of vehicles in the race of obstacles on the national highway 
अकोला

राष्ट्रीय महामार्गावर अडथळ्यांच्या शर्यतीत वाहनांच्या लागल्या लांब रांगा

सकाळ वृत्तसेेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम प्रचंड रखडले असून बंद अवस्थेतील 'शकुंतले'च्या अरुंद फाटकाजवळील नादुरूस्त रस्त्यामुळे या महामार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी होत असून अपघातांची शक्यता बळावली आहे.


वाहनाची वर्दळ वाढली आहे. अचलपूर-यवतमाळ रेल्वे 'शकुंतला' फाटक अरुंद आहे. फाटकादरम्यान मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. जडवाहनांना फाटक पार करणे जिकरीचे होता आहे. अशा अडथळ्यांच्या शर्यतीत या महामार्गावर आज संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या.

'शकुंतला' फाटकाच्या एका बाजूला संभाजी चौक व दुसऱ्या बाजूला कंझरा टी पॉईंट आहे. या दोनन्ही चौकात मोठी वर्दळ असते.

या ठिकाणी शहरातून येणारे दोन्ही रस्ते पुर्णतः बंद होऊन राष्ट्रीय महामार्गापासून शहरा पर्यंत व राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या. वाहतूक विस्कळीत झाली. नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी या रेल्वे फाटकातील खड्डे बुजविण्याची मागणी केली होती व ती बेदखल राहिली, हे विशेष.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT