Akola News: NAFED agency to the private sector by beating the Agricultural Produce Market Committee 
अकोला

कृषी उपन्न बाजार समितीला डावलून खासगी संस्थेला नाफेड एजन्सी

सकाळ वृत्तसेेवा

तेल्हारा (जि.अकोला) : शासन निर्णयानुसार आधारभूत किंमती योजनेअंतर्गत सन २०२०-२१ खरीप हंगामातील तेल्हारा येथे नाफेडची मका, ज्वारी खरेदी एजन्सी मिळावी अशा मागणी ता.९ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांच्याकडे केली.

त्यानंतर देखील जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांनी सदर प्रस्ताव मंजूर न करता बाळापूर येथील स्व. वसंतराव दादळे खासगी कृषी बाजार समिती पारस या खासगी संस्थेला नाफेडची खरेदी एजन्सी दिल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हाराचे सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर यांनी केला आहे.


तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता तेल्हारा येथे ही खरेदी सुरू करण्यात यावी अशा आशयाचे पत्र जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांना दिले होते. तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे खरेदीला लागणारी संपूर्ण व्यवस्था, गोडावून, टिनशेड, ताडपत्री, इलेक्ट्रिक, काटे, शिलाई मशीन, मॉईशचर, मशीन, चाळण्या, मनुष्यबळ असतानाही जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांनी खासगी संस्थेला दिलेली नाफेडची एजन्सी रद्द करण्यात यावी व ती तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थेला द्यावी जेणेकरून तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी माल विक्रीची सुविधा होईल, असे सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर यांनी सांगितले.


तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नाफेडची मका, ज्वारी खरेदी तेल्हारा येथे सुरू व्हावी अशी मागणी करूनही हेतुपुरस्सरपणे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांनी आमचा प्रस्ताव डावलून बाळापूर तालुक्यातील पारस येथील खासगी संस्थेला दिली. हे अयोग्य आणि अन्यायकारक असल्याची खंतही सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर यांनी व्यक्त केली.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार सुरुच, किराणा व्यापाऱ्याची भर बाजारात हत्या, हल्लेखोरांनी वेढले अन्...

Instagram Love Crime : सोशल मीडियावर मैत्री, मैत्रीचे रूपांतर प्रेमात; कोल्हापुरात पोट भरायला आलेल्या युपीवाल्यासोबत १६०० किमी प्रवास करण्यास निघाली अन्...

Virgo Horoscope 2026 : यंदा 'शुभ मंगल' होणार? 'कन्या राशी'च्या मुला-मुलींसाठी प्रबळ विवाहयोग; नवीन वर्षात लग्न ठरण्याचे ठळक संकेत

Latest Marathi News Live Update : लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही; भाजप प्रदेशाध्यक्षांना रितेश देशमुखचं उत्तर

Success Story: वैष्णवी वाकुडकरची सहाय्यक पदाला गवसणी; पाहीलेलं स्वप्न जिद्दीच्या जाेरावर सत्यात उतरवलं, आई-वडीलांच्या डाेळ्यात पाणी!

SCROLL FOR NEXT