Akola News: Now go anywhere, Mumbai, Pune! Maharashtra, Vidarbha, Sevagram Express to start, reservation facility available from 15th October 
अकोला

आता मुंबई, पुणे कुठेही जा! महाराष्ट्र ,विदर्भ, सेवाग्राम एक्स्प्रेस होणार सुरू, आरक्षण सुविधा १५ ऑक्टोबरपासून उपलब्ध

संजय सोनोने

शेगाव (जि. बुलडाणा)  ः कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांपासून बंद असलेली रेल्वे सेवा थोड्याफार प्रमाणात रुळावर येत आहे.अनलाॅक ५ मध्ये राज्यांतर्गत प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे.

त्यानुसार रेल्वे खात्याने दसरा-दिवाळी सणासाठी येत्या २० ऑक्टोबरपासून रेल्वे सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यात मुंबई-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड तपाेवन एक्स्प्रेस, पुणे-नांदेड सुपरफास्ट एक्स्प्रेस या मराठवाड्यातील प्रवाशांसाठी उपयाेगी ठरणाऱ्या तीन गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांसाठी १५ ऑक्टोबरपासून आरक्षण करता येईल.


राज्यांतर्गत या गाड्या सुरू हाेणार

  • मुंबई-पुणे (डेक्कन एक्स्प्रेस)
  • मुंबई-पुणे (इंटर सिटी)
  • मुंबई-पुणे (सिंहगड)
  • मुंबई-पुणे (प्रगती एक्स्प्रेस)
  • मुंबई-अमरावती एक्स्प्रेस
  • मुंबई-नागपूर (सेवाग्राम एक्स्प्रेस)
  • मुंबई-गोंदिया (विदर्भ एक्स्प्रेस)
  • मुंबई-लातूर, मुंबई-सोलापूर (सिद्धेश्वर एक्स्प्रेस)
  • मुंबई-काेल्हापूर (महालक्ष्मी एक्स्प्रेस)
  • पुणे-सोलापूर (हुतात्मा एक्स्प्रेस)
  • पुणे-नागपूर सुपर फास्ट, पुणे-नागपूर (गरीबरथ एक्स्प्रेस)
  • पुणे-भुसावळ, काेल्हापूर-गोंदिया (महाराष्ट्र एक्स्प्रेस).


साप्ताहिक हावडा-मुंबई मेल व हावड-अहमदाबाद विशेष गाडी आता दररोज
रेल्वेप्रशासनातर्फे यात्री सुविधा साठी दोन गाड्यांच्या संचालनामध्ये वाढ करण्यात आली आहे. पहिले या दोन गाड्या त्रीसाप्ताहिकमध्ये चालवल्या जात होत्या, आता ते या दररोज धावणार आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Ajit Pawar: राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री! सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ; कोणतं खातं मिळणार?

Amit Shah criticizes Mamata Banerjee : "मोमो फॅक्ट्रीत कोणाचे पैसे जमा होते?" ; अमित शहांचा ममता बॅनर्जींना खडा सवाल!

Sharad Pawar: पटेल–तटकरे थेट रडारवर, शब्द कमी, पण सत्तेच्या केंद्रावर वार... शरद पवारांच्या शांत चेहऱ्यामागची आक्रमक राजकीय खेळी

Economic Survey 2025-26: लठ्ठपणाची 'साथ' रोखण्यासाठी सरकार आक्रमक; जंक फूडवर महागडा टॅक्स लागणार? आर्थिक सर्वेक्षण अहवाल समोर

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा

SCROLL FOR NEXT