Akola News: Pick-wise deadline for participating in the Prime Minister's Crop Insurance Scheme 
अकोला

पंतप्रधान पीक बिमा योजनेत सहभागी होण्यासाठी पिकनिहाय मुदत

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  : भारत सरकारद्वारे २०२० च्‍या रब्‍बी हंगामासाठी रायगड, धुळे, पुणे, औरंगाबाद, हिंगोली, अकोला, पालघर व भंडारा जिल्‍ह्यांमधील कर्जदार असलेल्‍या आणि नसलेल्‍या शेतकऱ्यांकरिता प्रधानमंत्री फसल बिमा योजना राबविली जात असून, योजनेची अंमलबजावणी करण्‍याचे अधिकार एचडीएफसी ॲर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत.

पीएमएफबीवाय योजना दुष्‍काळ, पूर, कोरडे गवत, भूस्‍खलन, चक्रीवादळ, तुफान, कीटक, रोग व इतर अशा बाह्य धोक्‍यांमुळे पीक उत्‍पन्‍नासंदर्भात होणाऱ्या कोणत्‍याही नुकसानांसाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षणाची सुविधा देते. उत्‍पन्‍नामधील नुकसान निश्चित करण्‍याच्‍या उद्देशासाठी राज्‍य सरकार योजनेसाठी अधिसूचित भागांमधील अधिसूचित पीकांवर क्रॉप कटिंग एक्‍स्‍पेरिमेण्‍ट्सची (सीसीई) योजना आखेल व त्‍याची अंमलबजावणी करेल. सीसीईनुसार करण्‍यात आलेल्‍या संशोधनामध्‍ये उत्‍पन्‍न डेटा कमी असल्‍याचे आढळून आल्‍यास शेतकऱ्यांना उत्‍पन्‍नामध्‍ये नुकसान झाल्‍याचे मानण्‍यात येईल आणि यासंदर्भात क्‍लेम रक्‍कम देण्‍यात येईल.


ही योजना पेरणीपूर्वी, कापणी व कापणीनंतर अशा पीक चक्राच्‍या सर्व टप्‍प्‍यांदरम्‍यान येणाऱ्या धोक्‍यांसाठी विमा संरक्षण देते. पीएमएफबीवाय योजनेअंतर्गत सर्व उत्‍पादने कृषी विभागाकडून मान्‍यताकृत आहेत. योजनेअंतर्गत विमा संरक्षण प्राप्‍त करण्‍यासाठी शेतकरी त्‍यांच्‍या जिल्‍ह्यांमधील संबंधित बँका, सामान्‍य सेवा केंद्रे (सीएससी) यांच्‍याशी संपर्क साधू शकतात किंवा अधिकृत एजंट्सशी देखील संपर्क साधू शकतात.

अधिसूचित पीक व अंतिम तारीख
सोरघम जी., सोरघम बीए पिकासाठी ३० नोव्‍हेंबर २०२०, गहू बीए, हरभरा व इतर सर्व पिकासाठी १५ डिसेंबर २०२० आणि तांदूळ, भुईमूग या अधिसूचित पिकासाठी ३१ मार्च २०२१ अंतिम तारीख आहे.


विमाकृत राशी
विमाकृत राशी तांदूळ ५००००, भुईमूग ४००००, गहू ३७५००, रोगघम जी २५०००, सोरघम बीए ३००००, हरभरा ३५००० व कांदा ८०००० रुपये असून, रायगड जिल्ह्यात तांदूळ, भुईमूग, धुळे जिल्ह्यात भुईमूग, गहू, सोरघम जी, हरभरा, कांदा, पुणे जिल्ह्यात भुईमूग, गहू, सोरघम जी, सोरघम बीए, हरभरा, कांदा, औरंगाबाद जिल्ह्यात गहू, सोरघम जी सोरघम बीए, हरभरा, कांदा, हिंगोली जिल्ह्यात भुईमूग, गहू, सोरघम जी, हरभरा, अकोला जिल्ह्यात भुईमूग, गहू, हरभरा, कांदा तर, भंडारा जिल्ह्यात तांदूळ, गहू व हरभरा पिकांसाठी वरिलप्रमाणे विमाकृत राशी निर्धारित केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT