Akola News: Plot scam: Plots owned by Gram Panchayat exchanged in the name of citizens 
अकोला

भूखंड घोटाळा: ग्रामपंचायतीच्या मालकीचे प्लॉट परस्पर केले नागरिकांच्या नावे

सुगत खाडे

वल्लभनगर (जि.अकोला)  ः निंभोरा गट ग्रामपंचायतीच्या मालकीचे तब्बल ४९ प्लॉट परस्पर नागरिकांच्या नावे करण्याचा प्रकार येथे घडला होता. त्यामुळे या प्रकरणाची ग्रामपंचायत सदस्य कल्पना भगत यांनी अकोट फैल पोलिस ठाण्यात १ ऑगस्ट २०१८ रोजी तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा न दाखल करता गटविकास अधिकारी पंचायत समिती अकोला यांचा अहवाल मागितला होता.

दरम्यान गट विकास अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करुन भूखंड घोटाळा झाल्याचा ठपका ठेवला असून या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश ग्रामपंचायत सचिव निंभोरा यांना १२ ऑक्टोबर २०२० रोजी दिले आहे आहेत. त्यामुळे या प्रकरणी पोलिस केव्हा गुन्हा दाखल करताता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बनावट पावतीबुक प्रकरणी कर्मचारी दोषी
येथे बनावट पावतीबुकच्या आधारे नागरिकांकडून रक्कम वसूल करण्यात आली होती. या प्रकरणात सुद्धा मोठा घोळ झाला होता. दरम्यान संबंधित प्रकरणी ग्रामपंचायत कर्मचारी नितीन देशमुख चौकशीत दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल.


ग्रामपंचायतीच्या मालकीचे प्लॉट परस्पर नागरिकांच्या नावे करण्याच्या प्रकरणात पोलिस तक्रार दाखल करण्याचे आदेश गट विकास अधिकारी पंचायत समिती अकोला यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी वरिष्ठांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
- अनंत वावगे, सचिव, ग्रा.पं., निंभोरा, ता. अकोला

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: जंगलावर कुणाचा डोळा? CJI Suryakant यांच्या संतापानंतर राज्य सरकार अडचणीत, वनजमिनीवर हात टाकणाऱ्यांची आता खैर नाही?

Gold Price Today : सोने सलग दुसऱ्या दिवशी महागले, नव्या वर्षात नवा उच्चांक गाठणार, जाणून घ्या तुमच्या शहरात आज काय आहे भाव?

Silver Price Hike : चांदीच्या दरात दहा हजार रुपयांची, दरवाढ कमी होणार नाही तज्ज्ञांचा अंदाज

पोलीस अधिकारी असून माझी ८ कोटींची फसवणूक झाली, माजी IPS अधिकाऱ्यानं स्वत:वर झाडून घेतली गोळी

Latest Marathi News Live Update : कंबोडियात किडनी विक्रीसाठी प्रवृत्त करणारा एजंट 'डॉ. कृष्णा' पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT