Akola News: A police officer died of a heart attack at the police station 
अकोला

पोलिस ठाण्यातच पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

सकाळ वृत्तसेेवा

मोताळा (जि.बुलडाणा) : बोराखेडी पोलिस ठाण्यात कार्यरत नापोकाँ दादाराव संपत दाभाडे (५०) यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.९) रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बोराखेडी पोलिस वर्तुळात शोककळा पसरली आहे.


तालुक्यातील तिघ्रा येथील मूळ निवासी असलेले नापोकाँ दादाराव संपत दाभाडे हे हल्ली मोताळा येथे वास्तव्यास होते. त्यांची बोराखेडी पोलिस ठाण्यात नेमणूक झाली होती. दादाराव दाभाडे यांना डेंग्यू आजाराची लागण झाली होती.

त्यांच्यावर मोताळा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, सोमवारी त्यांना अस्वस्थ जाणवत असल्याने डॉक्टरांनी बुलडाणा रेफर केले. त्यामुळे श्री दाभाडे यांना बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

परंतु सोमवारी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा बराच आप्त परिवार आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेल्या दादाराव दाभाडे यांच्या अचानक मृत्यूने बोराखेडी पोलिस दलासह परिसरात शोककळा पसरली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारताच्या सुवर्णपदकाच्या शर्यतीला होणार सुरुवात! 'या' संघाविरुद्ध क्वार्टर-फायनलचा सामना, पाहा Schedule

Leg Cramps: रात्री पायात तीव्र कळ; स्नायू आखडतात अन् झोप उडते! जाणून घ्या शरीरातील पाण्याची कमतरता की गंभीर आजार?

Indrayani Express: इंद्रायणी एक्सप्रेस बालकासाठी थांबली; वेळेवर उपचाराने जीव वाचला

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

SCROLL FOR NEXT