Akola News: Retired ST employee warned of indefinite fast 
अकोला

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

सकाळ वृत्तसेेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला) ः येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळ ( एस.टी.) सेवानिवृत्त कर्मचारी बी.यू.इंगळे यांनी ता.१४ डिसेंबरपासून विभाग नियंत्रण कार्यालयासमोर समोर रास्त मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. ते अकोला विभाग नियंत्रण कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते.

ता.३० एप्रील रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पेंशनसाठी लागणारी सर्व कागदपत्रे विभाग नियंत्रण अकोला कार्यालयातील प्रशासन लिपिक शेख अमीन यांच्या कडे दिली. त्यांनी संपूर्ण कागदपत्रांची शहानिशा देखील केली.

पेंशनची कागदपत्रे पेंशन विभागात का पाठविण्यात आली नाहीत, अशी विचारणा इंगळे यांनी केली असता प्रशासकीय अधिकारी शंभरकर यांनी सध्या लिपीक नसल्याने पाठविता येणार नाही असे कारण समोर ठेवले.

सतत उडवाउडवीची उत्तरे देतात. विभाग नियंत्रण कार्यालयात चकरा मारून त्रस्त झाले आहे. पेंशनची रक्कम मिळण्यासाठी विनाकारण त्रास दिल्या जात आहे.

म्हणून शेवटी त्रस्त होवून ता.१४ डिंसेबरपासून विभाग नियंत्रण कार्यालय ( एस.टी.) विभाग अकोला कार्यालयासमोर कुटुंबासह बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा इंगळे यांनी विभाग नियंत्रण कार्यालयास एक पत्र देवून केला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोस्टल रोडवर BMW कारचा भीषण अपघात, १७ ते २५ वर्षीय ३ तरुणांचा मृत्यू; एक जण गंभीर

RASHID KHAN: राशिद खानला कर्णधारपदावरून हटवलं, पण बातमीच मिळाली नाही? म्हणाला- ‘मलाही...’; अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये नेमकं काय घडलं?

Kolhapur Gokul Election : गोकुळ निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं; भाजपने सर्व 25 जागांसाठी लावली ताकद, पाहा काय म्हणाले अमल महाडिक?

Sindhudurg ST Bus Accident : सिंधुदुर्गात थरारक अपघात; अरुणा धरणाजवळ मातीचा भराव ओलांडून थेट 200 फूट खोल दरीत कोसळली एसटी बस, 13 प्रवासी जखमी

India GDP Growth : भारताचा विकासदर सात टक्के राहील अर्थव्यवस्थेच्या लवचीकतेमुळे ‘मूडीज रेटिंग्ज’कडून अंदाजात सुधारणा

SCROLL FOR NEXT