Akola News: The risk of dengue has increased with corona, 11 patients have been found in the district so far
Akola News: The risk of dengue has increased with corona, 11 patients have been found in the district so far 
अकोला

 ७० हजारांवर शेतकऱ्यांची ‘दिवाळी गोड’!

मनोज भिवगडे

अकोला : यावर्षी जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ५१ हजार ६४८ हेक्टरवरील जियारती पिके व फळबागांची नासाडी झाली आहे. त्याबाबत पिकांचे संयुक्त पंचनामे महसूल, कृषी व जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले.

त्यानुसार जिल्ह्यातील ७० हजार ८४५ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३७ कोटी ८ लाख ७५ हजार ९६३ रुपयांच्या निधीची प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. राज्य शासनाने शुक्रवारी जाहीर केलेल्या मदतीच्या अनुशंगाने अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही दिवाळीपूर्वी ही मदत मिळण्याची आशा लागली आहे.


राज्यात यावर्षी मॉन्सूनचे ११ जूनरोजी आगमन झाले. त्यानंतर सुद्धा जिल्ह्यात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे धरणांची पाणीपातळी तळ गाठत होती. या स्थितीमुळे जिल्हावासियांना पेयजल संकटाला सुद्धा सामोरे जावे लागू शकते, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत होती. परंतु सदर स्थितीनंतर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे पावसाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. परंतु नंतरच्या काळात मात्र पावसाने रौद्र रूप दाखवले.

त्यामुळे सर्वत्र मूसळाधार पाऊस झाला. सततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला मूग व उडीद पिकांचे नुकसान झाले. सोयाबीनला, तूर, कपाशीला सुद्धा अति पावसाचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे कपाशीचे बोंड सुद्धा काळे पडले. झाडांची पडझड, फळ गळून पडल्याने बागायती शेतीचे सुद्धा चांगलेच नुकसान झाले. अनेक शेतात पाणी साचल्यामुळे पिकं सडली.

त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते. त्यानुसार जून ते सप्टेंबर दरम्यान, एकूण ८४० गावांमधील ५१ हजार ६४८ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे पंचनामे करण्यात आले आहे. त्यानुसार सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील एकूण ७० हजार ८४५ शेतकऱ्यांच्या ५१ हजार ६४८ हेक्टरपेक्षा पिकांचे नुकसान झाले आहे.


ऑक्टोबरमध्ये सर्व्हेच नाही
राज्यसह अकोला जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली. अनेक भागात मुसळधार पावसाचा फटका बसला. विशेषतः तेल्हारा, अकोट, पातूर व बार्शीटाकळी तालुक्याला पावसाने ऑक्टोबरमध्ये झोडपून काढले. मात्र, एकाही मंडळात प्रशासनाच्या वतीने सर्व्हे करण्यात आला नाही. त्यामुळे सप्टेंबरपर्यंतच बाधित झालेल्या शेत जमिनीसाठी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

(संपादक- विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT