Akola News: Shiv Sena burns yogi's statue after clash with police, verbal clash between police and Shiv Sainiks after agitation 
अकोला

तणाव : पोलिसांसोबत धक्काबुक्की करत शिवसेनेने जाळला योगींचा पुतळा, आंदोलनानंतर पोलिस व शिवसैनिकांमध्ये शाब्दीक चकमक

सकाळ वृत्तसेेवा

अकोला ः उत्तर प्रदेशामधील हाथरस गावात बलात्कार व हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शनिवारी (ता. ३) दुपारी जुने शहरातील जयहिंद चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जयहिंद चौकात वाहतूक कोंडी झाल्याने जुने शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश पवार यांनी आमदार गोपीकिशन बाजोरिया व इतर शिवसैनिकांना रस्त्याच्या बाजूला होण्याची विनंती केली.

त्यावर काही शिवसैनिकांनी आक्षेप घेतल्यानंतर घटनास्थळी पोलिस व शिवसैनिकांमध्ये धक्कामुक्की झाली. या प्रकरणी ठाणेदार पवार यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत जयहिंद चौकातून न हलण्याची भूमिका शिवसैनिकांनी घेतली. परिणामी घटनास्थळी तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.


उत्तर प्रदेशातील हाथरस येथील वाल्मिकी समाजातील तरुणीवर त्याच गावातील उच्च जातीच्या तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला मारहाण सुद्धा केली. प्रचंड जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनीच मुलीवर अंत्यसंस्कार केले. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेविरोधात देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत.

सदर घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने स्थानिक जयहिंद चौकात शनिवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यासह घोषणाबाजी सुद्धा केली.

या प्रकरणातील दोषींवर व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. या आंदोलनात आमदार गोपोलिशन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख, युवा सेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप, महिला जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवणीकर यांच्यासह इतर शिवसैनिकांची उपस्थित होती.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: अजितदादांच्या अपघात झालेल्या विमानातून मीही...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य, काय म्हणाले?

Mumbai: मुंबईत प्रवेश करताना दिसणार भव्य स्वागतद्वार! सर्व एंट्री पॉइंट्सवर प्रवेशद्वार बांधणार; रितू तावडेंची मोठी घोषणा

IND vs SA, Viral Video: गौतम गंभीरने लाईव्ह सामन्यात हार्दिक पांड्याचे कान उपटले... अरे तुला चेंडू तिथे टाकायची काय गरज!

धक्कादायक! Donald Trump यांच्या घरात बंदूक-इंधन कॅनसह घुसखोरीचा प्रयत्न; गुप्तहेरांच्या गोळीबारात संशयित ठार

Indrayani River Pollution: इंद्रायणी प्रदूषणास जबाबदार कंपन्यांवर कारवाई करणार; महापौर रवी लांडगे यांचा इशारा!

SCROLL FOR NEXT