Akola News: Starting school, where is the fund? 
अकोला

शाळा सुरू करताय, निधी कुठे आहे?

सकाळ वृत्तसेवा

अकोला  ः राज्य सरकारने दिवाळीनंतर ता. २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या अटी शर्ती पण घातल्या. मात्र शाळा चालू करताना लागणारे सॅनिटायर्सर, थर्मल, ऑक्सी मीटर कोण देणार, याबाबत स्पष्टता नाही. शाळांकडे याबाबत निधी नाही. शासनाकडून अनुदान नाही.

त्यामुळे येणाऱ्या अचडणी सोडविण्यासाठी सरकारने साहित्य खरेदीसाठी तत्काळ शाळांना आर्थिक निधीची तरतूद करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

अनेक अटीतटी घालून दिवाळी नंतर शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत .त्यासाठी शाळांमध्ये सॅनीटायझर ,ऑक्सी मीटर, थर्मल स्कॅनर ,ठेवणे अनिवार्य केले आहे .मात्र परिस्थिती ही आहे की हे साहित्य कोठून आणावे?असा प्रश्न राज्यातील मुख्याध्यापकांना पडला आहे .

शहरासह ग्रामीण भागातील शिक्षण संस्था चालक खर्च करू शकत नाहीत. शिवाय अनेक ठिकाणी जिल्हा परिषद मार्फत शाळा चालतात. शाळेमधील स्वच्छता निर्जंतुकीकरण कसं करावं ,असे अनेक प्रश्न मुख्याध्यापकांच्या समोर उभे आहेत.

खरंतर शाळा सुरू करण्याच्या अगोदर सरकारने या गोष्टीचा विचार करायला हवा होता. वास्तविक पाहता संकटाचा सामना करण्यासाठी सर्वसामान्य जनतेने मायबाप सरकारला मोठ्या प्रमाणावर निधी दिला? त्या निधीतून म्हणजेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून सरकारने याची तरतूद आगोदर करायला हवी होती. मात्र एक रुपयाची तरतूद न करता शाळा सुरू करण्याचा आदेश म्हणजे मुलांच्या जिवाशी खेळ होऊ शकतो ?

त्यामुळे राज्य सरकारने अगोदर राज्यातील शाळांना करोना प्रतिबंधक साहित्य घेण्यासाठी तत्काळ आर्थिक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. निधी उपलब्ध करून दिला तरच मुख्याध्यापक साहित्य खरेदी करू शकतील.

याचा वापर नियोजित वेळेस होईल .अन्यथा शाळा चालू करणे धोक्याचे राहील .सरकारने हा विचार करून तत्काळ निधी मंजूर करावा नंतरच शाळा चालू कराव्यात, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT