Akola News: There is nothing in the position by spending lakhs of rupees 
अकोला

लाखो रुपये खर्च करून पदरात काहीच नाही

कृष्णा फंदाट

तेल्हारा (जि.अकोला) :  तालुक्यातील जमीन सर्वच पिकांसाठी पोषक असल्याने केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पण केळीचे दर घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.


यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे बागायती पिकासह जिरायती हंगाम चांगलाच बहरला. परंतु ऐन कापणीच्या वेळेस अतिपावसाने मूग, उडीद आदी पिके हातची गेली. नंतर परतीच्या पावसाने सोयाबीन, ज्वारी, कापूस, तीळ आधी पिकांना मोठा फटका बसला. त्यापासून फळ बागाही सुटल्या नाहीत.

तेल्हारा तालुक्यातील बेलखेड, माळेगाव बाजार, दानापूर, हिगनी, हिवरखेड, खंडाळा, सौंदळा आदी गावांमध्ये केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी आपल्या शेतात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती.

रात्रंदिवस एक करून लाखो रुपये खर्च करून केळीचे पीक लहानाचे मोठी केली; मात्र यावर्षी केळीचे घड कापणीला सुरुवात झाली तेव्हा केळीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला.

त्यामुळे केळीला कोणी घेवालच नव्हता. बाजारपेठेत केळीला केवळ दोनशे ते अडीचशे रुपये क्विंटलचा भाव होता. मधल्या काळात केळीच्या भावामध्ये थोडा सुधार झाला; मात्र पुन्हा केळीचे दर घसरले. आज साडेतीनशे ते साडे चारशे रुपये क्विंटल प्रमाणे केळीला मागणी होत आहे. या भावात केलेल्या खर्चाचा विचार करता विकणे परवडत नाही.

उत्सवातील मागणीही घटली
गणपती, देवी या सणासुदीच्या काळात केळीला बऱ्यापैकी दर मिळतो; पण यावर्षी तसे घडले नाही. तेल्हारा तालुक्यातून प्रामुख्याने गुजरात, मध्यप्रदेश व अन्य प्रांतात केळी पाठवली जातात. पण परतीच्या पावसाने कापणीस आलेली केळी शेतामध्ये तशीच आहे. कटनी होत नाही व बाजारपेठेमध्ये देखील भाव नाहीत. काहींच्या केळीला घडे नाहीत. त्यावर रोगराई वाढली. या सर्व कारणांमुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.


यावर्षी केळीला भाव नसल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना एकरी एक ते दीड लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. शासनाने याबाबत फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठे पॅकेज जाहीर करावे व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- रमेश खारोडे, उत्पादक शेतकरी, तळेगाव बाजार

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT