Akola News: Wife and child killed with sharp weapon, both accused in police custody 
अकोला

पत्नी व मुलाने धारदार शस्त्राने केला खून, दोघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शाहीद कुरेशी

मोताळा (जि.बुलडाणा) : एका ४५ वर्षीय व्यक्तीचा पत्नी व मुलाने धारदार हत्याराने खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी (ता.६) रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास गोशिंग येथे घडली.

याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

सविस्तर असे की, बोराखेडी पोलिस ठाण्यांतर्गत गोशिंग येथील ४५ वर्षीय व्यक्तीला दारूचे व्यसन होते. संबंधीत व्यक्ती रविवारी रात्री दारू पिल्याने पत्नी व मुलासोबत भांडण झाले.

या भांडणाच्या कारणावरून मुलाने आईच्या मदतीने स्वतःच्या वडिलांच्या मानेवर धारदार हत्याराने वार करून त्याची निर्घृण हत्या केली.

माहिती मिळताच बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड, एपीआय राहुल जंजाळ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यातील भुम शहरात पुतळ्यावरुन तणावाचे वातावरण

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

SCROLL FOR NEXT