Akola News: Wrong posting of Marathi medium teachers! 
अकोला

मराठी माध्यमाच्या शिक्षकांना चुकीच्या पद्धतीने पदस्थापना!

सुगत खाडे

अकोला ः जिल्हा परिषदेत सोमवारी (ता. १९) मराठी माध्यमाच्या शिक्षकांना समूपदेशनाने पद स्थापना देण्याबाबतची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आली.

त्यामुळे सदर प्रक्रियेवर प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे. आक्षेप नोंदवण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार व शिक्षणाधिकारी प्राथमिक वैशाली ठग यांच्या सोबत चर्चा केली.

शिक्षकांच्या विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्यांसदर्भात प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेतली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंतर जिल्हा बदली टप्पा ४ मधील उर्दू माध्यमाच्या बदली झालेल्या सर्व शिक्षकांना हजर करुन घेण्याबाबत चर्चा केली.

त्यासह उर्दू माध्यमातील अनुसूचित जमाती मधील जात वैधता प्रमाणपत्र नसलेल्या शिक्षकांना अधिसंख्य पदावर सामावून घेण्याबाबत शासन निर्णय आणि शासन पत्रक दाखवून या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली. वरील सर्व प्रलंबित प्रकरणे आठ दिवसात निकाली न निघाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा प्रमुख मंगेश टिकार, हेमंतकुमार बोरोकार, अमोल वर्हेकर, श्रीराम झटाले, शिरीष जाधव आणि इतर उर्दू बांधव शिक्षक उपस्थित होते.


शिक्षकाधिकाऱ्यांसोबत चर्चा
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश आहे.
- आंतर जिल्हा बदली टप्पा ४ मधील मराठी माध्यमाच्या शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत समूपदेशन प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आली. त्यामुळे ज्या शिक्षकांवर अन्याय झाला त्यांना पदस्थापना बदलून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
- उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना हजर करुन घेणेबाबत आवश्यक कागदपत्र आणि शासन निर्णय निदर्शनास आणून दिले. त्यावर कार्यवाही करण्यास सांगितले.
- बिंदुनामावली व पदोन्नती बाबत पुढील कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

IND vs AFG: वैभव संजू ईशान श्रेयस सगळे तयार, मग तिलक वर्माचं काय? AB डिव्हिलियर्सने टीम इंडियासमोर उभा केला मोठा पेच, ‘तो कुठे खेळणार?

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Marathi News Live Updates : आम्ही कुणाच्या विरोधात नाही, सर्वांसोबत आहोत : PM मोदी

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

SCROLL FOR NEXT