अकोला

अकोला; लसीकरण केंद्रावर जिल्हाबाहेरील व्यक्ती

सकाळ वृत्तसेवा

चतारी (जि.अकोला) ः पातुर तालुक्यातील चतारी ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) कोरोना लसीकरण (Corona vaccination) चालू असून, मागील काही दिवसांपासून या रुग्णालयात लसीकरण घेण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातील नागरिक हजेरी लावत आहे. परिणाम कोविड-१९ ची नियमावली पायदळी तुडवत या लसीकरण केंद्रावर केराची टोपली दाखवल्या जात असल्याचेही चित्र दिसत आहे. Akola; Persons from outside the district at the vaccination center

बाहेरील जिल्ह्यातील नागरिक कोविड-१९ नियमावलीचे नियमाचे पालन न करता नागरिक मनमानी करीत असल्याने लसीकरण केंद्राच्या यात्रेमध्येचे स्वरूप आल्यासारखे दिसून येत आहे. या गंभीर विषयाकडे आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित करून कोविड-१९ च्या सर्व नियमानुसार पालन करून लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

एवढेच नव्हे तर या लसीकरण केंद्रावर जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील नागरिकांचे चांगल्या प्रमाणात लस घेण्यासाठी हजेरी लावत असल्याचे ही पहावयास मिळत आहे. यासर्व प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. ऑनलाईन प्रक्रियेमध्ये नोंदणी करण्यासाठी परिसरातील नागरिकांना तारेची कसरत करावी लागत आहे. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचा वेळ अनेक नागरिकांना माहिती नाही.

ऑनलाईन करण्यासाठी किती वाजता साईट चालू राहते आणि किती वाजता बंद राहते हे सुद्धा माहिती नाही. याबाबत केंद्रावरही याविषयी कुठल्याही संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून माहिती देण्यात येत नसल्याने या विषयी संबंधित परिसरातील नागरिकाना माहिती देणे फार गरजेचे आहे.

लसीकरण केंद्रावर पूर्णपणे कोविड-१९ सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. याकडे संबंधित लसीकरण केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी यांनी याकडे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी लाकडाऊन संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे कुठल्याही प्रकारचा डोळेझाक पणा न करता.आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित करून लसीकरण करावे.अशी लसीकरण घेण्यासाठी येत असलेल्या नागरिकांसह स्थानिक ग्रामस्थांची मागणी जोर धरीत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांनी सायंकाळी सहा ते आठ दरम्यान साईट ओपन असते त्यामध्ये नोंदणी करून परिसरातील नागरिकांनी लसीकरण घेण्यासाठी नोंदणी करून घ्यावी . पातुर पी. एस. सी किंवा चतारी ग्रामीण रुग्णालय मध्ये लसीकरण चालू आहे.

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा लसिकरण अधिकारी.

संपादन - विवेक मेतकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT