Akola Political News Disagreement in Congress Press Council Leader Municipal Corporation Ramakant Khaitan Sajid Pathan 
अकोला

काँग्रेसमध्ये मतभेद; पत्रकार परिषदेतून उठून गेले नेते, विरोधी पक्ष नेत्यांसह ज्येष्ठ नेत्यांची नाराजी

सकाळ वृत्तसेवा

अकोला, :  महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आयुक्तांवर कारवाई व मनपा बरखास्तीची मागणी करण्यासाठी काँग्रेसने बुधवारी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेतच काँग्रेस नेत्यांमधील मतभेद उफाळून आले. मागणीबाबत नेत्यांमध्येच एकवाक्यता नसल्याने पत्रकार परिषद सुरू असतानाच मनपा विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण, ज्येष्ठ नेते रमाकांत खेतान उठून गेले.

हेही वाचा - ऐऽऽ शंकरपाळ्या! 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई', दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सुसाट....

महानगरपालिकेतील गुंठेवारीस अनेक विषयांच्या भ्रष्टाचाराचा लेखाजोखा माध्यमांपुढे मांडण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी व इंटक नेते प्रदीप वखारिया यांनी बुधवारी पत्रकार परिषद बोलाविली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी मनपा आयुक्त व सत्ताधारी भाजपवर अनेक आरोप केले.

या कामांची चौकशी करून मनपा बरखास्तीची मागणीही त्यांनी केली. पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधी प्रश्न विचारीत असताना आयोजकांऐवजी काँग्रेसेच्या इतर काही नेत्यांनी उभे राहून स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली. याशिवाय ज्यांचा पक्षाही काही संबंध नाही, अशा एका युवकानेही पुढे येत मनपा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुरज यांच्यावर आरोप केलेत. आरोपांबाबत काँग्रेस नेत्यांकडे कोणतेही स्पष्टीकरण नसल्याने माध्यमांच्या प्रश्नांवर त्यांना निट उत्तरही देता आली नाही.

त्यातच पत्रकार परिषद सुरू असताना काँग्रेसच्या नेत्यांमधील मतभेदही उफाळून आले. पत्रकार परिषद सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमाकांत खेतान उठून गेलेत. त्यांच्यापाठोपाठ मनपातील विरोधी पक्ष नेते साजित खान पठाण यांनीही पत्रकार परिषद अर्धवट सोडल्याने त्यांचेही वखारीया यांच्या विचारांशी सहमत नसल्याचे दिसून आले. त्यापूर्वीच पक्षातील काही युवा पदाधिकारी निघून पत्रकार परिषद सोडून निघून गेले होते.

हेही वाचा - प्रेमात आंधळा झालेल्या प्रियकरचा असाही प्रताप, धक्कादायक पाऊल उचलल्याने पोलिसांच्याही डोक्याला ताप

पक्षा नेतृत्वाकडे करणार तक्रार
मनपाच्या कारभाराबाबत काँग्रेसच्या नावाने पत्रकार परिषद घेणाऱ्यांची काँग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी आणि प्रदेश पक्ष नेतृत्वाकडे तक्रार करणार असल्याचे मनपा विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

(संपादन - विवेक मेतकर)

अकोला जिल्ह्यातील बातम्या - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Milk Union : पुणे दूध संघातील गैरव्यवहारांची चौकशीची टिळेकरांची मागणी; कारवाई करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन

Chakur News : चाकूरचे नगराध्यक्ष करीम गुळवे यांचा राजीनामा

Pune Palakhi Sohala: ज्ञानेश्वर-तुकाराम पालख्यांच्या पुण्यातील मुक्कामाची जय्यत तयारी; वारकऱ्यांसाठी निवास, भोजन, स्वच्छतेची चोख व्यवस्था

Cristiano Ronaldo Retirement News: "होय, हा माझा शेवटचा वर्ल्ड कप होता, पण..."; रोनाल्डोची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; म्हणाला, मी माझे सर्वस्व दिले...

SET Date Change: एमपीएससी परीक्षा व आषाढी वारीमुळे राज्यस्तरीय सेट परीक्षा २६ जुलैऐवजी ६ सप्टेंबरला; विद्यार्थ्यांच्या मागणीला विद्यापीठाची मान्यता

SCROLL FOR NEXT