Akola Tree Collapsed 4 died devendra fadnavis announced assistance to families of those who died in Paras  Sakal
अकोला

आरती सुरू असताना मंदिराच्या शेडवर झाड कोसळलं, ६ भाविकांचा मृत्यू; फडणवीसांनी जाहीर केली मदत

रोहित कणसे

Akola Tree Collapsed : अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच मंदिराच्या शेडवर झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

तसेच या शेडखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्य रात्री उशीरपर्यंत सुरू आहे. यादरम्यान सरकारकडून जखमी तसेच मृतांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे

फडणवीस ट्वीटमध्ये म्हणाले आहेत की, "अकोला जिल्ह्यातील पारस येथे एका धार्मिक समारंभासाठी काही लोक एकत्र आले असता, टिनाच्या शेडवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो."

फडणवीस पुढे म्हणाले की, "जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली असून जखमींवर वेळेत उपचार व्हावेत यासाठी ते समन्वय ठेवून आहेत. आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. काही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किरकोळ जखमींवर बाळापूर येथे उपचार करण्यात येत आहेत", अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय

मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांनी घेतला आहे असेही त्यांनी सांगितले.

रविवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे हे झाड मंदिराच्या शेडवर कोसळलं. यादरम्यान शेडखाली ४० ते ५० जण दबले गेले. यापैकी ६ जणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर या घटनेत ८ जण गंभीर जखमी आहेत. मात्र हा आकडा वाढण्याची भीती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT