crop sakal
अकोला

अकोला : ‘दव’ पडत असल्याने तूर, हरभरा पीक धोक्यात

दव पडत असल्याने हरभरा, तूर पीक धोक्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा (जि. अकोला) : तालुक्यात दोन-तीन दिवसाआधी आलेल्या पावसामुळे तालुक्यातील काही गावांमध्ये शेतात सकाळी दव पडत असल्याने हरभरा, तूर पीक धोक्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तालुक्यात यंदा सुरुवातीला पाऊस कमी झाल्याने पेरणी उशिरा करण्यात आली. त्यामुळे मूग, उडीद पिकांवर बेंडक्या आल्याने सदर पीक मातीमोल झाले. तर, सोयाबीन एकरी एक ते दीड क्विंटल उत्पादन झाले.

काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात ट्रॅक्टर फिरवून त्यामध्ये हरभरा पेरणी केली. तर, काहींनी तूर पीक कायम ठेवले. मात्र, बदलत्या वातावरणाचा परिणाम व दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे काही गावांमध्ये पाऊस आल्याने सकाळी मोठ्या प्रमाणात दव पडत असल्याने हरभरा पिकांवर मर रोग येत आहे. तर, तूर पिकांचे फुले गळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आधिच पावसामुळे कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद, तिळ हे पीक शेतकऱ्यांचे हातून गेले आहेत. मात्र, तरीही शेतकरी हिम्मत न हारता हरभरा, तूर पिकांवर मोठ्या आशेने उत्पादन वाढावे म्हणून खर्च केला. परंतु, अचानक आलेल्या पावसामुळे आता या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

"मी, पाच एकरात उडीद पेरणी केली होती मात्र, ऐन सोगंणीच्या वेळी पाऊस आल्याने उडीद पिकांचे शेंगा गळून पडल्याने शेतात रोटावेटर फिरवून आता हरभरा पेरणी केली आहे. मात्र, दोन दिवस आधी आलेल्या पावसामुळे आता हरभरा पिकांचेही नुकसान होताना दिसत आहे."

- सुबोध राऊत, शेतकरी, तळेगाव बाजार

"ढगाळ वातावरणमध्ये तूर पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून शेतकऱ्यांनी कर्बेनडेझीन एक ग्रॅम किंवा डायथेन एम २.५० ग्रॅम प्रति लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी."

- मिलिंद वानखडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election Voting Live : राज्यात २९ महापालिकेसाठी आज मतदान, मुंबई, नाशिक, कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा, शहराच्या कारभाऱ्यांचा होणार फैसला

Satara politics: साताऱ्यात भाजपला रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र?; शिवसेना अन् दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून गतिमान हालचाली!

Elections 2026: मतदानाआधीच राजकीय वातावरण पेटलं! नागपूरात BJP उमेदवारावर हल्ला तर नाशकात शिंदेंच्या उमेदवारावर अपहरणाचा गुन्हा

Satara Crime: प्रत्येकी १५ लाख दे, अन्यथा जगणे मुश्कील करू; खंडणी मागितल्याप्रकरणी साताऱ्यात चौघांवर गुन्हा!

Voter List Issue : मतदारयाद्यांत अजूनही गोंधळ; प्रभाग बदलले, कुटुंबातील नावे वेगवेगळ्या केंद्रांवर

SCROLL FOR NEXT