attempt to kill revenue employees and officials for action on illegally transporting sand akola crime esakal
अकोला

Akola Crime : तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

दोन्ही पक्षाचा युक्तिवादानंतर तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील पाटील यांच्या न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अवैध रेती वाहतूक करून महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या अंगावर चारचाकी वाहन चालवून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी दोन्ही पक्षाचा युक्तिवादानंतर तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील पाटील यांच्या न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.

फिर्यादी अजय कुमार पंजाबराव तायडे वय ४४ वर्षे, यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मौजे अनभोरा येथे वसुलीच्या निमित्त सोबत नायब तहसीलदार करतारे, मंडळ अधिकारी जि.टी. राजनकर हे सोनोरी फाट्या समोर चांदणी बाबा एमएच ३० एबी १६४४ ट्रकची तपासणी करीत होते. यावेळी ट्रकचा चालक वाहन सोडून पळून गेला.

यादरम्यान ट्रक मालक अब्दूल आसिफ अब्दुल कदीर रा. अकोला याने एम. एच. ३० ए.एफ. २००९ क्रमांकाचे वाहन जिवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर नेले. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील पाटील यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला कलम ३५३ नुसार दोषी ठरविले.

याप्रकरणी न्यायालय आरोपीला आज शिक्षा सुनावणार आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. आनंद गोदे यांनी बाजू मांडली तर पैरवी अधिकारी म्हणून पाचपोर यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT