अकोला

आठ खासगी शाळांचे आजपासून ऑडिट

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः वारंवार शुल्क वाढवणे, ऑनलाईन शिक्षण न देणे, प्रशासनाचे आदेश न जुमानने आदी स्वरुपाच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या खासगी शाळांचे आर्थिकबाबत लेखापरीक्षणास गुरुवारपासून प्रारंभ हाेणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संंबंधित आठ शाळांच्या मुख्याध्यापकांना तसे पत्रही पाठवले आहे. (Audit of eight private schools from today)


शुल्कवाढ व ऑनलाइन शिक्षणासह अन्य प्रकाराबाबत तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या हाेत्या. या तक्रारी शिक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांच्याही कार्यालयाला सादर करण्यात आल्यात. यावर ता. १४ जून राेजी पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेवून तक्रारी प्राप्त झालेल्या खासगी शाळांचे शैक्षणिक गुणवत्ता व आर्थिक लेखापरिक्षण(ऑडिट) करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांना उपसंचालकांना परवानगी मागितली हाेती.

उपसंचालकांनी परवानगी दिल्यानंतर ऑडिट करण्यात येत आहे. त्यात अकाेल्यातील माऊंट कारमेल प्राथमिक व माध्यमिक शाळा, स्कूल ऑफ स्काॅलर प्राथमिक व माध्यमिक शाळा, पाेदार इंटरनॅशनल प्राथमिक व माध्यमिक शाळा, हाेलीक्राॅस प्राथमिक व माध्यमिक शाळा, निशू नर्सरी व काेठारी काॅन्व्हेंट, एमराॅल्ड हाईट्स प्राथमिक व माध्यमिक शाळेचा (केशव नगर, गीता नगर, राऊतवाडी) आदी शाळांचा समावेश आहे.


Audit of eight private schools from today

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT