अकोला

भाजपकडून १४ जागांसाठी ८० इच्छुकांच्या मुलाखती

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पाेटनिवडणुकीसाठी भाजपने १५४ इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या. यात जि.प.च्या १४ रिक्त जागांसाठी ८० इच्छुकांचा तर प.सं.च्या २८ जागांसाठी ७४ जणांचा समावेश आहे. भाजपच्या प्रदेशास्तरावरील नेत्यांनी यापूर्वीच सर्व िरक्त जागांवर ओबीसी समाजातील उमेदवारांना संधी देणार असल्याचे जाहीर केले तरी अकोल्यात मुलाखती घेताना सर्वच जाती-धर्माचे इच्छुक उपस्थित होते. (BJP interviews 80 aspirants for 14 seats)

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे रिक्त झालेल्या ओबीसींच्या जागांवर येत्या १९ जुलै रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी ता. ३० जून राेजी भाजप पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्यात. मुलाखती प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा प्रभारी माजी मंत्री डाॅ. संजय कुटे, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, तेजराव थोरात कुसुम भगत, विजय अग्रवाल, मनीराम टाले, माधव मानकर, उमेश पवार आदींनी घेतल्या.

पद गमावणाऱ्या सदस्यांकडूनही उमेदवारीची मागणी
सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपच्या कुटासा (स्री) सर्कलच्या कोमल पेटे, बपोरी- माया कावरे, घुसर- पवन बुटे यांचे सदस्यत्व रद्द झाले हाेते. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. भाजप त्यांना संधी देते की, नवा गडी नवा राज हे धोरण अवलंबिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


BJP interviews 80 aspirants for 14 seats

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

Video: मुलं आजूबाजूला खेळतायेत अन् कपल्सचा पार्कच्या मधोमध 'रोमान्स'; व्हिडिओ पाहून लोकांचा संताप

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

SCROLL FOR NEXT