स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ६० हजारांचा मुद्देमाल जप्त sakal
अकोला

अकोला । घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस

सकाळ वृत्तसेवा

अकोला : डाबकी रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात उघडीस आणून, आरोपीला बेड्या ठोकल्यात. आरोपीकडून चोरीतील ६० हजारांचा मुद्देमालही जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी गोपनिय माहितीवरुन संशयीत आरोपी नामे अभिषेक अनिल वासनकर (१९ , रा. बाजार चौक आगर) यास ताब्यात घेतले. पोलिस खाक्या दाखवित त्याची विचारपूस केली असता त्याने व त्याचा एक साथीदार (विधीसंघर्ष ग्रस्त बालिका) यांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्यास ताब्यात घेवु विचारपुरस करून नमुद गुन्ह्यातील ६० हजारांचा माल हस्तगत करीत २४ तासाच्या आत सदर गुन्हा उघडकीस आणला आहे. पुढील तपास कामी आरोपीला डाबकी रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, सपोनि. नितीन चव्हाण, सपोउपनि गोपीलाल मावळे, संतोष गवई, विजय यादव, फिरोज खान, संदीप काटकर, गीता अवचार, शक्ती कांबळे, विरेंद्र लाड, उदय शुक्ला, पवन यादव, सतीष गुप्ता, सुशील खंडारे, सायबर पोकॉ गणेश सोनोने यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; जाणून घ्या बेंगळुरू-चेन्नईची प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT