corona updates sakal
अकोला

Corona Update : अकोला जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

एकाच दिवशी आढळले १९९ पॉझिटिव्ह; नागरिक बिनधास्त, रस्त्यावर विनामास्क गर्दी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : एकीकडे अकोला जिल्ह्यात(Akola District) कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी (ता.११) तर दिवसभरात कोरोना चाचणीचे ६९३ अहवाल प्राप्त झालेत. त्यापैकी १८० तर रॅपिड ॲन्टीजेन चाचणीत १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. नागरिक मात्र विनामास्क बिनधास्तपणे रस्त्यावरून गर्दी करीत फिरताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाला निर्बंध अधिक कठोर करण्याची वेळ आली आहे.

अकोला जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. बुधवारी तर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येचा विस्फोटच झाला. गेले सात-आठ महिन्यांपासून एक आकडी असलेली संख्या गत आठवडाभरात दोन आकडी तर आता थेट तीन आकडी झाली आहे. मंगळवारी प्राप्त अहवालातील एकूण १९९ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात संसर्गाचा धोका वाढल्याचे स्पष्ट होत आहे. (Omicron And Corona Update)

तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर अकोला जिल्ह्यात आतापर्यंत नोंदविल्या गेलेली ही सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण संख्य आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त अहवालांपैकी १५३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. खासगी तपासणी केंद्रातून प्राप्त अहवालातील २७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. आरटीपीसीआरचे एकूण १८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, सोमवारी रात्री रॅपिड ॲन्टीजेन चाचणीत १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

२५ जणांची कोरोनावर मात

जिल्ह्यात एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत हे. मंंगळवारी दिवसभरात होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत कोरोनातून मुक्त झालेल्या २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५८७ आहे.

बँकेची पाहणी

जिल्हाधिकारी कार्यालय चौकात असलेल्या एचडीएफसी बँकेत जाऊन कर्मचाऱ्यांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही याची उपविभागीय अधिकारी नीलेश अपार यांनी पाहणी केली. यावेळी खासगी कार्यालयातील ५० टक्के उपस्थितीच्या नियमाचे पालन करण्याबाबतच्या सूचना दिल्यात.

उपविभागीय अधिकारी उतरले रस्त्यावर

कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना नागरिक मात्र विनामास्क शहरात फिरत आहे. ते बघून उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालय परिसरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर स्वतः दंडात्मक कारवाई केली. रस्‍त्यावर उतरून नागरिकांना मास्क लावण्याबाबत सूचना दिल्यात. त्यानंतरही न ऐकणाऱ्यांना प्रत्येकी २०० रुपये दंड आकारण्यात आला.

व्यावसायिकांनाही दंड

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व्यावसायिकांना मास्क लावणे बंधनकारक केले आहे. मात्र, विनामास्क व्यवसाय करणारे अनेक जण आढळून आल्याने त्यांनाही प्रत्येकी २०० रुपये दंड आकारण्यात आला. काहींनी तर मास्क लावला असतानाही त्यांना कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नावे दंडाची पावती फाडली.

दुचाकी चालकाने घातला वाद

जिल्हाधिकारी कार्यालय चौकात उपविभागीय अधिकाऱ्यांसोबत असलेल्या पथकातील पोलिस कर्मचारी व महसूलच्या कर्मचाऱ्यांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी एका विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वाराने दंड आकारणीवरून पोलिस कर्मचारी व महसूलच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला. ते बघण्यासाठीही नागरिकांनीह येथे गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT